कोकण संस्थेने अनाथ मुलांसाठी सोबत साजरा केला नाताळ सण
बांदा / राकेश परब : दरवर्षी २५ डिसेंबर हा दिवस नाताळ सण म्हणून साजरा केला जातो, या दिवशी समाजातील बरीच मंडळी वेगवेगळी पद्धतीने हा सण साजरा करतात, या दिवसाचे शहरी भागातील शाळेत जाणाऱ्या मुखत्वे इंग्रजी मिडीयम मध्ये जाणाऱ्या मुलांना खूप आकर्षण असते कारण या दिवशी सांताक्लॉजच्या वेशात काही मंडळी त्यांना खाऊ आणि भेटवस्तू देतात पण समाजातील काही वंचित, अनाथ रस्त्यावर राहणारी मुले अश्या या कार्यक्रमाचा कधी लाभच घेऊ शकत नाहीत आणि त्यांना असे सण साजरे हि करता येत नाहीत. बऱ्याच वेळा आपण बघतो कि हीच रस्त्यावर राहणारी मुले नाताळची टोपी विकतात पण ते मात्र या टोप्या घालून हा सण साजरा करू शकत नाहीत. कोकण संस्थेच्या कार्यकर्त्यांनी यासाठी रस्त्यावरील मुलांसाठी आज सांता बनून वडाळा, टिटवाळा, माटुंगा मुंबई आणि स्वारगेट पुणे विभागात अनाथ मुलांना खेळणी आणि खाऊ वाटप केले.
..विश्वास, आशा आणि प्रीती हि येशूची त्रिसूत्री जीवनात अवलंबली तर आपले जीवन सुखात व्यतीत होईल, प्रत्येक माणसात देव आहे त्यामुळे माणसावर प्रेम केले पाहिजे असे मुलांशी बातचीत करताना प्रीती पांगे यांनी सर्व मुलांना सांगितले.
कोकण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक उपक्रम राबवले जातात . आज पार पडलेल्या या उपक्रमात संस्थेच्यावतीने साक्षी पोटे, प्रीती पांगे, गणेश जाधव , फरहान शेख, राहुल वैराळ , साई कोंडूरूपका , नेहा कोडम , मनोश्री कांचन, काजल सिंग , सेजल दुबे,सई उतेकर, ख़ुशी पांडे, प्रियल सोलंकी आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)