ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांद्यात पतंजलीच्या अग्निहोत्र कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बांद्यात पतंजलीच्या अग्निहोत्र कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद

प्रकाशन: 19 Dec 2021 06:09 PM
वाचन संख्या 34

बांदा /राकेश परब : पतंजली योगपीठाच्या वतीने बांदा येथिल योगवर्गात आयोजित केलेल्या अग्निहोत्र कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. बांदा दशक्रोशी पतंजली योग वर्ग आणि गोवा राज्य पतंजली यांच्या वतीने बांदा येथे योगप्रसाराचे कार्य मोठ्या वेगात सुरु आहे. सध्या बांदा येथे एक महिना कालावधीचे योग शिक्षक प्रशिक्षण शिबिर सुरु आहे.तसेच शंखप्रक्षालन व एडव्हान्स योगा सारख्या अनेक उपयुक्त योगक्रियांचे बांदा परिसरातील योगाभ्यासकांना तज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन मिळत आहे. या योगाभ्यासातील एक महत्वाचा घटक असलेला अग्निहोत्र हा हवनाचा कार्यक्रम गुरुवार दि.१६ रोजी बांदा योगवर्गात घेण्यात आला.     

बांदा व्यापारी भुवन येथिल श्री विठ्ठल रखुमाई मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात विशेष मार्गदर्शक आचार्य आर्य नरेश यांनी बहुमोल माहीती व विस्तृत विवेचनासह सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रज्वलित केलेली हवनकुंडे व मंत्रोच्चारांमुळे वातावरण अत्यंत प्रसन्न वाटत होते.  या कार्यक्रमासाठी आचार्य अशोक ,आचार्य मीराबेन ,आचार्य सिद्धार्थ ,गोवा राज्य यज्ञ प्रभारी पोपटभाई पटेल , पतंजली गोवा प्रभारी विश्वास कोरगांवकर,  पतंजली दक्षिण गोवा प्रभारी रामा नायक आदि उपस्थित होते.     

प्रास्ताविक सुदन केसरकर यांनी केले. मान्यवरांचे स्वागत संजय नाईक ,अनिल मणियाद, संतोष चिंदरकर,सिद्धेश पावसकर ,नितीन मावळंकर, गीता गर्दे यांनी केले. सुत्रसंचालन नंदादिप केळुसकर यांनी तर आभारप्रदर्शन विकी केरकर यांनी केले.

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स