ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
निगुडे-सोनुर्ली या अरुंद असलेल्या रस्त्यावर मोठया प्रमाणात ओव्हरलोड खनिज  वाहतुकीवर आळा घालण्यासाठी निवेदन
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

निगुडे-सोनुर्ली या अरुंद असलेल्या रस्त्यावर मोठया प्रमाणात ओव्हरलोड खनिज वाहतुकीवर आळा घालण्यासाठी निवेदन

प्रकाशन: 19 Dec 2021 05:23 PM
वाचन संख्या 25

बांदा /राकेश परब : निगुडे-सोनुर्ली या अरुंद असलेल्या रस्त्यावर मोठया प्रमाणात ओव्हरलोड खनिज वाहतूक होत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाणे दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या अवैध वाहतुकीवर आळा घालण्यात यावा, अशी मागणी निगुडे सरपंच समीर गावडे यांनी सिंधुदुर्ग आरटीओचे अधिकारी नंदकिशोर काळे यांच्याकडे केली आहे. याबाबत लक्ष वेधण्यासाठी त्यांनी नुकतीच श्री. काळे यांची भेट घेतली. यावेळी अशा प्रकारे वाहतूक करणार्‍या संबधित डंपर चालकांना दुप्पट दंड आकारुन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी खास भरारी पथक नेमण्यात आले आहे, असे श्री. काळे यांनी सांगितले. याबाबतची माहीती श्री. गावडे यांनी प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. त्यात त्यांनी म्हटल्यानंतर सोनुर्ली,निगुडे आदी भागातून येणार्‍या डंपरमधून रात्री बारा ते सकाळी नऊ वाजेपर्यत विनापरवाना खनिज वाहतूक होते. त्यामुळे हा प्रकार रोखण्यात यावा, तसेच या मागे नेमके कोण आहे? याचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स