ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भगीरथ प्रतिष्ठान चे डाॅ. प्रसाद देवधर यांच्या मार्फत सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था , कसाल यांना संगणक संच व झेराॅक्स मशीन प्रदान
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भगीरथ प्रतिष्ठान चे डाॅ. प्रसाद देवधर यांच्या मार्फत सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था , कसाल यांना संगणक संच व झेराॅक्स मशीन प्रदान

प्रकाशन: 18 Dec 2021 01:58 PM
वाचन संख्या 52

आचरा/विवेक परब : भगीरथ प्रतिष्ठान , झाराप या संस्थेमार्फत डाॅ. प्रसाद देवधर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिंव्यांगांसाठी काम करत असलेली संस्था ” सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था ,कसाल ” यांना संगणक संच व झेराॅक्स मशीन देऊन त्या संस्थेची अडचण दूर केली. गेली १२ वर्षे अनिल बापु शिंगाडे हे दिंव्यांग बांधवांना विविध शासकीय योजना मिळाव्यात म्हणून प्रयत्न करत आहेत . स्वतः दिंव्यांग असताना दिव्यांगासाठी करत असलेली धडपड तसेच त्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेले कार्य लक्षात घेऊन भगीरथ प्रतिष्ठानने त्यांच्या संस्थेस संगणक संच व झेराॅक्स मशीन देऊन त्यांच्या कार्याची दखल घेतल्याचे डाॅ. प्रसाद देवधर यांनी सांगितले . कसाल येथे सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंटर्लसचे अध्यक्ष डाॅ. प्रशांत कोलते यांच्या हस्ते फीत कापुन संगणक संच व झेराॅक्स मशीन संस्थेस प्रदान करण्यात आला . यावेळी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर , जिल्हा संघटनसरचिटणीस प्रभाकर सावंत , डाॅ.प्रसाद देवधर , कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सचिव यशवंत परब , उद्योजक नवीन बांदेकर , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , संघाचे कार्याध्यक्ष लवु म्हाडेश्वर , सामाजिक कार्यकर्ते अवधुत मालणकर , दिव्यांग आघाडीचे जिल्हा सहसंयोजक शामसुंदर लोट , शासकीय सुविधा संयोजक प्रकाश वाघ तसेच संस्थेचे दिंव्यांग सभासद उपस्थित होते .

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स