ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सायकल फेरीद्वारे केली बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी अपंगदिन जनजागृती

सायकल फेरीद्वारे केली बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी अपंगदिन जनजागृती

प्रकाशन: 04 Dec 2021 07:34 PM
वाचन संख्या 20

बांदा / राकेश परब : जागतिक अपंग सप्ताहाच्या निमित्ताने जिल्हा परिषद केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी सायकलद्वारे प्रभातफेरी काढून जनजागृती केली.
सर्वांचा निर्धार,अपंगाचा स्विकार,’ ‘अपंगाचा सन्मान, हाच आमचा अभिमान,’ ‘अपंगाचे शिक्षण ,प्रगतीचे लक्षण ‘अशा प्रकारच्या घोषणा देत विद्यार्थ्यांनी सायकल वरून काढलेली रॅली लक्षवेधी ठरली. या सप्ताहाच्या निमित्ताने बांदा केंद्रशाळेत चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत धीरज सतिश पटेल याने प्रथम क्रमांक मिळवला तर ललिता राजन देसाई हिने द्वितीय , प्रज्वल विष्णू लमाणी तृतीय तर हर्षाली अनिल म्हाडगुत हिने चतुर्थ क्रमांक मिळवला. या यशस्वी विद्यार्थ्यांना उमेद फौंडेशनच्या वतीने भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख संदीप गवस मुख्याध्यापक सरोज नाईक व सर्व शिक्षक उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स