ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सुख शांती मंडळ साळशी-सरमळेवाडी च्या वतीने यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

सुख शांती मंडळ साळशी-सरमळेवाडी च्या वतीने यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

प्रकाशन: 20 Nov 2021 11:49 AM
वाचन संख्या 60

शिरगांव / संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील साळशी -सरमळेवाडी येथील सुखशांती मंडळाच्या वतीने माध्यमिक विद्यामंदिर साळशी या प्रशालेतील इयत्ता दहावीच्या परीक्षेतील पहिले सर्वोच्च तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना भेट वस्तू , सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रशालेतील विघ्नेश घाडी(प्रथम क्रमांक) तन्वी घाडी (द्वितीय क्रमांक)आरती घाडीगांवकर (तृतीय क्रमांक ) या गुणवंत विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुखशांती मंडळाच्या वतीने भेटवस्तू व सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. ही सन्मानचिन्हे कै. हरिश्चंद्र राघो सावंत यांच्या स्मरणार्थ सावंत कुटुंबीयांकडून देण्यात आली होती. गणित व इंग्रजी विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांनाही श्री. अशोक कदम व श्री.यशवंत लाड यांच्या वतीने पाचशे रुपयांचे बक्षीस देण्यात आले. यावर्षी या प्रशालेने शंभर टक्के निकाल लावल्याबद्दल शिक्षकांचा व संस्थेचाही सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी स्कूल कमिटी चेअरमन सत्यवान सावंत यांनी सुख शांती मंडळ हे विविध उपक्रम राबविणारे साळशी येथील एकमेव मंडळ आहे .मंडळाने सामाजिक बांधिलकी या नात्याने राबविलेला उपक्रम प्रेरणादायी आहे.मंडळाचे अध्यक्ष अशोक कदम यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे कौतुकास्पद आहे.विद्यार्थ्यांनी यशात सात्यत ठेवावे.मंडळाचे सचिव राजेंद्र साटम यांनी प्रस्तावनेतून गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी या उद्देशाने सुख शांती मंडळाच्या वतीने गेली सात वर्षे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपक्रम राबविण्यात येत आहे असे सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक माणिक वंजारे यांनी मंडळाचा उपक्रम विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगून मंडळाचे आभार मानले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अशोक कदम, सचिव राजेंद्र साटम,विजय लाडगांवकर, प्रकाश रावले, विनायक रावले,सुरेश कदम, भूषण कदम, शाळेचे चेअरमन सत्यवान सावंत,मुख्याध्यापक माणिक वंजारे, शिक्षक वर्ग ,विद्यार्थी उपस्थित होते. पुरुषोत्तम साटम यांनी सूत्रसंचालनातून मंडळाच्या अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते असे मत व्यक्त केले.स्वप्नील भरणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स