ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अखिल भारतीय मच्छीमार गाबित महासंघाकडून जातप्रमाणपत्राविषयी आवाहन..!

अखिल भारतीय मच्छीमार गाबित महासंघाकडून जातप्रमाणपत्राविषयी आवाहन..!

प्रकाशन: 17 Nov 2021 12:30 PM
वाचन संख्या 56

सरचिटणीस सुरेश बापर्डेकर यांची माहिती..

                                                                                                    मालवण | प्रतिनिधी : गाबीत समाजातील मुलांना जातीचे प्रमाणपत्र तसेच जात पडाळणीसाठी बऱ्याच अडचणी येत असून त्यांची प्रकरणे पुराव्या अभावी  निकालात काढून त्यांची निराशा होत आहे .यामुळे शाळेतील सवलती पासून वंचित राहव लागत असून काहींना नोकऱ्या भरती प्रमोशन होत नाहीत.बऱ्याच तक्रारी येत असल्याने अखिल भारतीय मच्छीमार गाबित समाज महासंघाचे सरचिटणीस सुरेश बापर्डेकर यांनी त्वरित  मीटिंग घेऊन होणाऱ्या समस्यांवर कशाप्रकारे तक्रारीचे निवारण करावे  याबाबत विचार विनिमय होऊन सर्वानुमते ठरविण्यात आले असल्याने गाबित समाजातील सर्व समाज बांधवांना असे सूचित करण्यात येत की जातीचे प्रमाणपत्र ,जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविताना जे जे अडचणींना आणि समस्यांना आपणांस सामोरं जावं लागलं त्यांनी आपल्या ज्याकाही तक्रारी असतील त्यांनी आपल्या लेखी निवेदने दिनांक २५/११/२०२१ पर्यंत लेखी द्यावेत .त्यात आपला संपर्क क्रमांक न विसरता नमूद करावा. त्यानंतर शिष्टमंडळ आपली बाजू मांडण्याकरिता संबधित अधिकारी यांची भेट घेऊन समस्या माडणार आहेत.तरी समाज बांधवांनी सुरेश बापर्डेकर, मु.पो.तारकर्ली ,तालुका मालवण ,सिंधुदुर्ग.तसेच महासंघाचे अध्यक्ष  श्री.शंकर पोसम  ९९६९९७००५६, सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख श्री.विजय राऊळ  ९४२३५११८२२, मालवण प्रमुख श्री.बबन कोयंडे ९४२३८३४८९७,वेंगुर्ले प्रमुख श्री.दाजी जुवाटकर ८२६२०३०४७७ यांच्याशी लवकरात लवकर संपर्क साधावा.असे आव्हान अखिल भारतीय मच्छीमार गाबित समाज महासंघ युवक प्रमुख प्रसाद बापर्डेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स