आपली सिंधुनगरी चॅनेल
माध्यमांच्या मेळ्यामध्ये सामिल होताना खरंच खूप आनंद आहे. मुळात स्पर्धा ह्या घटकाशी अंतर ठेवत ठेवत आपल्या चॅनेलची निर्मिती झालेली असल्याने इतर सर्व माध्यमांकडे आपलेच सहकारी अशाच भावनेतून आम्ही बघत आहोत.
समाजातील सर्व घटकांवर प्रकाश टाकायचा प्रयत्न करत असताना अगदी ‘ एकही घटक ‘ त्यातून वगळला जाऊ नये ह्यासाठी ‘आपली सिंधुनगरी’ चॅनेलचे सर्व सहकारी भरपूर कसोशीने मेहनत घेत आहेत.
आपली सिंधुनगरी चॅनेल हे लोकशाहीचा एक स्तंभ म्हणून आदराने पाहिल्या जाणार्या माध्यमांच्या क्षेत्रात खूप मोठी क्रांती किंवा सुधारणा करायचे दावे नक्कीच करत नाही तर त्या स्तंभाच्या सात्विक झळाळीसाठी आपले खारीचे योगदान देण्याचा आमचा प्रयत्न असेल.
राजकारणाला निव्वळ राजकारण आणि समाजकारणाला स्पष्ट समाजकारण असं तटस्थपणे किंवा जे जसं आहे तसं आपल्या समाजातील वाचक,श्रोते तथा प्रेक्षकांसमोर आणायचा आपला साधा ,सरळ व थेट प्रयत्न असेल.
महाराष्ट्र राज्यासाठी प्रचंड मोठा राजकीय,सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रिडा,पर्यटन, आणि वैद्यकीय वारसा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आपण संपूर्ण जगाला एका साध्या सोप्या माध्यमातून वास्तवदर्शी असे काही देऊ शकतोय ह्याचाही आनंद आहेच…
थोडक्यात असं म्हणलं तर वावगं नसेल की जगातील कुठल्याही घटनेचे,व्यक्तिचे,स्थळाचे,विचाराचे,तत्वाचे,प्रणालीचे वर्णन आपण “मेक इन सिंधुदुर्ग” करत आहोत…आणि त्याचे माध्यम “आपली सिंधुनगरी” आहे.
तुम्हा सर्वांचे सोबत असणे हीच ऊर्जा ही अभेद्य सिंधुदुर्ग किल्ल्यासारखीच अढळ व अथक आहे.
धन्यवाद.
मुख्य संपादक.
(आपली सिंधुनगरी चॅनेल)
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)