ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
बांदिवडेतील प्रगत कृषकाच्या मिरी लागवड क्षेत्रात पोहोचले किर्लोसच्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रशिक्षणार्थी..!

बांदिवडेतील प्रगत कृषकाच्या मिरी लागवड क्षेत्रात पोहोचले किर्लोसच्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रशिक्षणार्थी..!

प्रकाशन: 09 Nov 2021 03:23 PM
वाचन संख्या 100

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमांतर्गत प्रशिक्षणार्थींना विविध ठिकाणचे अभ्यासदौरे करणे अनिवार्य आहे. याच कार्यक्रमांतर्गत सदर प्रशिक्षणार्थींना बांदिवडे येथील प्रगत शेतकरी मिलिंद प्रभू यांच्या मिरी लागवड क्षेत्रावर भेट देत मिरी पीक, काढणी व प्रक्रिया उद्योग तसेच सुरू असलेले संशोधन प्रकल्प याबाबत माहिती घेतली.
यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे मृद शास्त्रज्ञ विकास धामापूरकर यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना प्रकल्प माहिती दिली. मिरी बागेचे व्यवस्थापक संतोष घाडीगांवकर यांनी बागेचे व्यवस्थापन कशा पद्धतीने केले जाते याची सविस्तर माहिती दिली. सुमारे चाळीस प्रशिक्षणार्थी यावेळी सहभागी झाले होते. संतोष घाडीगांवकर यांनी सर्वांचे आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स