ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारीपदी दीपक शेलार यांची पदभार स्विकृती.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारीपदी दीपक शेलार यांची पदभार स्विकृती.

परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारीपदी दीपक शेलार यांची पदभार स्विकृती.

Article image


मालवण शहरातील कायदा, सुव्यवस्था आणि आगामी उपक्रमांबाबत पोलीस प्रशासनाची भूमिका केली स्पष्ट.


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण पोलीस ठाण्याच्या परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारीपदी दीपक शेलार यांनी पदभार स्वीकारला आहे. पदभार स्विकृतीनंतर त्यांनी शहरातील कायदा, सुव्यवस्था आणि आगामी उपक्रमांबाबत पोलीस प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली आहे.


सध्याचा श्री गणेशोत्सव तसेच अकरा दिवसांच्या आणि अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि लेझर लाईट्सचा वापर कोणीही करू नये, तसेच सर्व गणेशभक्तांनी शांततेत विसर्जन मिरवणुका काढाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.


येत्या काळात मालवण पोलीस ठाण्याच्या वतीने विविध मोहिमा राबविल्या जाणार आहेत. यात अवैध धंदे, बेकायदेशीर वाहतूक, नशाबंदी तसेच अंमली पदार्थांचे सेवन व विक्री करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.


वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कडक नजर ठेवली जाणार आहे. जे पालक आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास देतात, त्यांचे पहिल्या टप्प्यात समुपदेशन व जनजागृती केली जाईल. मात्र, त्यानंतरही सुधारणा न झाल्यास संबंधित पालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.


शहरात कुठेही अवैध धंदे किंवा नियमबाह्य वाहतूक सुरू असल्यास नागरिकांनी तात्काळ मालवण पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या नागरिकांची नावे पूर्णपणे गुप्त ठेवली जातील, असे आश्वासन दीपक शेलार यांनी दिले आहे.


पोलीस हे जनतेचे सेवक आहेत. मालवण शहर स्वच्छ, निरोगी आणि नशामुक्त ठेवणे हे आपले ध्येय आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व अंमलदार कर्तव्य बजावतील. मालवणमध्ये चांगले आणि सुरक्षित पर्यटनाचे वातावरण निर्माण करून शहराच्या विकासाला हातभार लावण्याचे नियोजन आहे, असे दीपक शेलार यांनी स्पष्ट केले.


पोलीस प्रशासन जनतेच्या सेवेसाठी पूर्णपणे कटिबद्ध असून या सर्व मोहिमांमध्ये मालवणच्या सुजाण नागरिकांचे उचित सहकार्य लाभेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत  क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन.

लोकप्रिय टॅग्स