ताज्या बातम्या
कथाकार शांताराम पुरस्कारासाठी सचिन मणेरीकर यांच्या ‘फणस - कोकणातल्या माणसांच्या गोष्टी’ पुस्तकाची निवड. दिवंगत नाना पाटेकर यांच्या कुटुंबियांचे आमदार निलेश राणे यांच्याकडून पुणे येथे निवासस्थानी भेट घेत सांत्वन. मालवणात मोकाट श्वान निर्बिजीकरण मोहीम सुरू. हा खरा राष्ट्रभक्त कलाकार आपल्यात नाही यावर विश्वासच बसत नाही : पालकमंत्री नितेश राणे आनंदव्हाळ - कर्लाचाव्हाळ येथे वनराई बंधारा. मुणगे गावचे माजी सरपंच तथा ज्येष्ठ भजनीबुवा सुरेश बोरकर यांचा सत्कार. श्री घुमडाई देवी मंदिरात १२ व १३ ऑक्टोबर रोजी सर्वांच्या कल्याणासाठी नवचंडी याग. मालवण ग्रामीण रुग्णालयातील 'क्ष - किरण' यांत्रिक तपासणी सुविधा पूर्ववत. ॲड. देवदत्त परुळेकर यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा अध्यात्मिक वाङ्मय पुरस्कार जाहीर. सेवानिवृत्त बॅंक कर्मचारी सतीश सुरेश कासले यांचे निधन.
गाबीत समाज सिंधुदुर्ग संस्थेची नूतन विश्वस्त मंडळ व कार्यकारिणी जाहीर.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

गाबीत समाज सिंधुदुर्ग संस्थेची नूतन विश्वस्त मंडळ व कार्यकारिणी जाहीर.

गाबीत समाज सिंधुदुर्ग संस्थेची नूतन विश्वस्त मंडळ व कार्यकारिणी जाहीर. 

Article image

अध्यक्षपदी चंद्रशेखर उपरकर यांची फेरनिवड आणि कार्याध्यक्षपदी हरिश्चंद्र खोबरेकर व तर सरचिटणीसपदी महेंद्र पराडकर यांची निवड. 


मालवण | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण येथील गाबीत समाज नागरी पतसंस्था हॉलमध्ये, नुकतीच 'गाबीत समाज, सिंधुदुर्ग' संस्थेची बैठक संपन्न झाली. यावेळी नूतन विश्वस्त मंडळ व कार्यकारी मंडळाची निवड जाहीर करण्यात आली. गाबीत समाज सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्या जिल्हा सर्वसाधारण सभेत संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी चंद्रशेखर उपरकर यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी हरिश्चंद्र खोबरेकर, तर सरचिटणीसपदी महेंद्र पराडकर यांची निवड करण्यात आली.


नूतन कार्यकारिणीत सरचिटणीसपदी मेघनाद धुरी व पूजा सरकारे, खजिनदारपदी पांडुरंग कोचरेकर, हिशेब तपासणीसपदी दीपक तारी यांची निवड करण्यात आली. तसेच डॉ. प्रमोद कोळंबकर, शंकर ऊर्फ दादा वाघ, संजय बांदेकर, स्नेहा केरकर, सेजल परब, पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी, संजय केळुस्कर, मिथुन मालंडकर आणि नरेश हुले यांची विश्वस्त सदस्य म्हणून निवड करण्यात आली. यावेळी मालवण नगरपालिकेचे नगरसेवक तथा बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर व देवगड तालुका गाबीत संघटना अध्यक्ष संजय पराडकर यांच्या हस्ते नूतन जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी देवगड तालुका सरचिटणीस लक्ष्मण तारी, बाळा मुणगेकर, रमेश तारी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


देवगड तालुका गाबीत संघटनेचे अध्यक्ष संजय पराडकर यांनी चंद्रशेखर उपरकर यांच्या कार्याचे कौतुक केले. गेल्या तीन वर्षांत जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम केले असून, यापूर्वीही सुमारे २५ वर्षे जिल्हा संघटक म्हणून त्यांनी योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले. गाबीत समाज हा प्रामुख्याने मत्स्यव्यवसाय व पर्यटनाशी जोडलेला असून, पर्यटन संस्था, रापण मच्छिमार संघटना, महिला मच्छिमार संघटना, सांस्कृतिक कार्यक्रम, शिबिरे, मेळावे, विविध आंदोलने, मोर्चे तसेच गाबीत महोत्सवाच्या माध्यमातून समाजाच्या विविध प्रश्नांना सातत्याने वाचा फोडण्याचे काम करण्यात आले आहे.


यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांनी, गणेश चतुर्थीनंतर जिल्हा कार्यकारी मंडळासह गाबीत समाजाची वस्ती असलेल्या किनारपट्टीवरील तसेच इतर गावांमध्ये संपर्क दौरा आयोजित करून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. सरचिटणीस महेंद्र पराडकर यांनी आभार प्रदर्शन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

श्री घुमडाई देवी मंदिरात १२ व १३ ऑक्टोबर रोजी सर्वांच्या कल्याणासाठी नवचंडी याग.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री घुमडाई देवी मंदिरात १२ व १३ ऑक्टोबर रोजी सर्वांच्या कल्याणासाठी नवचंडी याग.

श्री घुमडाई देवी मंदिरात १२ व १३ ऑक्टोबर रोजी ...

07 Oct 2026 252

लोकप्रिय टॅग्स