ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
बांधकाम सभापती तथा नगरसेवक सहदेव बापर्डेकर यांचा विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बांधकाम सभापती तथा नगरसेवक सहदेव बापर्डेकर यांचा विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा.

बांधकाम सभापती तथा नगरसेवक सहदेव बापर्डेकर यांचा विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा. 

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण नगरपरिषद बांधकाम सभापती, नगरसेवक तथा लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांचा ६० वा वाढदिवस सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त राजकोट मित्रमंडळ आणि लायन्स क्लब ऑफ मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने दैवज्ञ भवन, मालवण येथे आयोजित मोफत नेत्र तपासणी, चष्मा वाटप शिबिर व रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Article image

या शिबिरांचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. रक्तदान शिबीरासाठी जिल्हा रक्त पेढी, ओरोस यांचे सहकार्य लाभले तर नेत्रतपासणीसाठी विवेकानंद नेत्रालय आणि रेटीना सेंटर, कणकवली यांचे सहकार्य लाभले. यामध्ये ६६ जणांनी रक्तदान केले. तर १५५ जणांची नेत्रतपासणी करण्यात आली. त्यापैकी ७२ जण चष्मा वाटपसाठी पात्र ठरले असून त्यांना लवकरच चष्मे वाटप करण्यात येणार आहे, त्यासाठी तारीख व ठिकाण ठरविण्यात येईल, असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.

Article image

यावेळी नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक सुदेश आचरेकर, माजी नगराध्यक्ष व विद्यमान स्वीकृत नगरसेवक महेश कांदळगावकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, महिला व बालकल्याण उपसभापती अश्विनी कांदळकर, नगरसेविका मेघा सावंत, राधिका मोंडकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहर संघटक व उद्योजक राजू बिडये, बबन शिंदे, सुनील खांदारे, संतोष खांदारे, सोनू खांदारे, हेमंत चव्हाण, परशुराम पाटकर, बाळू अंधारी, जॉन नऱ्होना, शेखर गाड, बबन रेडकर, अनिल कांदळकर, राजा शंकरदास, गणेश प्रभुलीकर, शांती पटेल, मुकेश बावकर, विश्वास गावकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, किसन मांजरेकर, नंदू देसाई, बाबा परब, संदीप गावकर, संजय नार्वेकर, पारितोष बापर्डेकर, हिमांशू बापर्डेकर, स्वप्नाली नेरुरकर, गीता बापर्डेकर, गौरी खांदारे, रूपा बिडये, मंदा जोशी, अनुष्का चव्हाण, मनाली दळवी, अंजली आचरेकर, जयश्री हडकर, वैशाली शंकरदास, नंदिनी गावकर, राजकोट मित्र मंडळ आणि लायन्स क्लब ऑफ मालवणचे सर्व सभासद उपस्थित होते. या शिबिरास अनेक मान्यवर व मित्रपरिवार यांनी उपस्थित राहून नगरसेवक सहदेव बापर्डेकर यांना शुभेच्छा दिल्या.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत  क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन.

लोकप्रिय टॅग्स