ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मालवण पोलीस निरीक्षकपदी अतुल जाधव यांची पदभार स्विकृती.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवण पोलीस निरीक्षकपदी अतुल जाधव यांची पदभार स्विकृती.

मालवण पोलीस निरीक्षकपदी अतुल जाधव यांची पदभार स्विकृती.

Article image

शहरातील विविध पदाधिकारी व मान्यवरांकडून नूतन वाटचालीसाठी शुभेच्छा.


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षकपदी अतुल माधवराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांची बदली झाल्यानंतर पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांची नियुक्ती झाली असून त्यांनी सोमवार, ३ ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारला. 


पोलीस निरीक्षक अतुल जाधव हे मूळ सातारा पुसेगाव येथील आहेत. २००१ साली पोलीस उपनिरीक्षक म्हणून नवी मुंबई जेएनपीटी येथून त्यांची पोलीस दलातील सेवा सुरू झाली. नांदेड देगलूर पोलीस ठाणे, नवी मुंबई, पनवेल, करंबोली येथे अधिकारी म्हणून, जेएनपीटी वाहतूक प्रभारी अधिकारी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला, वैभववाडी येथे प्रभारी अधिकारी म्हणून तर कणकवली पोलीस ठाणे, नियंत्रण कक्ष ओरोस याठिकाणी त्यांनी सेवा बजावली. पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांनी दिलेल्या आदेशानुसार त्यांची मालवण पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


मालवण पोलीस निरीक्षकपदी अतुल जाधव यांच्या पदभार स्विकृतीनंतर शहरातील विविध पदाधिकारी व मान्यवरांकडून त्यांची भेट घेऊन नूतन वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत  क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन.

लोकप्रिय टॅग्स