ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
आमदार निलेश राणे यांच्या विकासाच्या संकल्पनेतून व माध्यमातून जनहिताच्या दृष्टीने चिंदर गावातील प्रलंबित व ग्रामस्थांची अत्यावश्यक गरज असलेली विकासकामे पूर्ण : जिल्हाप्रमुख दत्ता सामंत
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार निलेश राणे यांच्या विकासाच्या संकल्पनेतून व माध्यमातून जनहिताच्या दृष्टीने चिंदर गावातील प्रलंबित व ग्रामस्थांची अत्यावश्यक गरज असलेली विकासकामे पूर्ण : जिल्हाप्रमुख दत्ता सामंत

आमदार निलेश राणे यांच्या विकासाच्या संकल्पनेतून व माध्यमातून जनहिताच्या दृष्टीने चिंदर गावातील प्रलंबित व ग्रामस्थांची अत्यावश्यक गरज असलेली विकासकामे पूर्ण : जिल्हाप्रमुख दत्ता सामंत 

Article image

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची स्वखर्चातून 'ॲटेटाईम १४' विकासकामे पूर्णत्वास.


आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची ग्रामस्थांमधून कृतज्ञता. 


मालवण | ब्यूरो न्यूज : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून चिंदर गावात विकासकामांना पूर्णत्व येत आहे असून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून 'ॲटेटाईम' गावातील १४ विकासकामे पूर्ण केली आहेत. ज्या वाडीत रस्ताच नव्हता तिथे नव्या रस्त्याची उभारणी झाली असून अनेक मार्गांवर पायवाटांचेही काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्वप्नवत तसेच अशक्यप्राय रस्त्यांना शक्य केले याबद्दल त्यांचे आभार मानत ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.



या विविध कामांमध्ये, वाडी - वाडीतील नव्या रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात आले. लब्देवाडी रस्ता, साटमवाडी रस्ता, कुंभारवाडी स्मशान रस्ता, तेरई मुख्य रस्ता ते ब्राम्हणदेव मंदिर, मुळेघर रस्ता, गावठवाडी (बागवाडी), मुख्य रस्ता ते गावडेपुरुष मंदिर रस्ता यांसह काँक्रिटकरण मध्ये सडेवाडी स्मशान रस्ता, गोसावीवाडी गणेश घाट रस्ता, देवकोंडवाडी, गोसावीवाडी पायवाट (घागरे घर) याठिकाणी काँक्रिटकरण करण्यात आले. तसेच मसूरकरवाडी महापुरुष पार बांधणे, पाटणकर वाडी येथील रस्त्यावर अडथळा ठरणारा वीज खांब एका दिवसात बाजूला करून दिला. यासोबत सडेवाडी स्मशान चौथरा उभरणीही करून देण्यात आली आहे.



ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यावश्यक कामे पूर्ण होत असताना शिवसेना विभाग प्रमुख संतोष कोदे, मंगेश गांवकर, भाऊ हडकर, मनोज हडकर, अजित साटम, सुरेश साटम, दत्तात्रय लाड, सुनील लब्दे, सागर परुळेकर, दत्ता वराडकर, शशी नाटेकर, आण्णा गोसावी, दिपक गोसावी, किरण सावंत, विनोद सावंत, जयेश गोसावी, उदय गोसावी, प्रवीण हडकर, संतोष गोसावी, प्रमोद घागरे, प्रवीण हडकर, राज लब्दे, वैभव वराडकर, संदीप सावंत, बाब्या सावंत, सुरेंद्र मुळे, सिन्मय मुळे, प्रमोद सुर्वे, अनिकेत साटम, भांजी साटम, सोहम सावंत, अमोल पारकर, अरुण घाडी, दिलीप पुजारे, प्रमोद पुजारे, निलेश रेवडेकर, आशिष कोरगावकर, छगन गांवकर, शिवराम गांवकर, गणेश गांवकर, रोहन गांवकर, गोविंद गांवकर, निलेश गांवकर, प्रसाद माडये, भाई अपराज, अमोल माळगांवकर, आशीर्वाद तावडे, गणेश लाड, दर्शन लाड, केतन कावले, दाजी कावले, सावळाराम कावले यांसह प्रत्येक वाडीतील ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले अशी माहिती मिळत आहे. यासोबत भाऊ हडकर यांनी स्वतःचा डंपर, जेसीबी, ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला. स्वतः योगदान आणि यंत्रणा दिली. त्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले असे समजते आहे.


ज्या वाडीत रस्ताच नव्हता, वृद्ध, आजारी व्यक्तीना गंभीर स्थितीत औषध उपचारासाठी डॉक्टरकडे नेताना मोठी समस्या निर्माण व्हायची. वाहने येण्याचा कुठलाच मार्ग नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत होत्या. ग्रामस्थांची गरज आणि अत्यावश्यक परिस्थिती लक्षात घेता आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्वखर्चाने रस्ते उभारणी व पायवाटा काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि तात्काळ काम पुर्ण करून दिले. आम्हाला स्वप्नातही वाटले नव्हते आमच्या वाडीत आमच्या घरा पर्यत रस्ते येतील. मात्र आमदार निलेश राणे, दत्ता सामंत यांनी अशक्य ते शक्य केले आहे. असे सांगत लब्देवाडी, साटमवाडी व अन्य वाडीतील ग्रामस्थ यांनी आभार व्यक्त केले आहेत. 


आमदार निलेश राणे यांचा नेहमीच विकासाचा दृष्टिकोन राहीला आहे. गावागावातील वाडी वस्ती पर्यत विकासकाम पोहचले पाहिजे. जनतेला अपेक्षित विकासकामे तात्काळ झाली पाहिजेत. विकास 

कामात राजकारण आणि मतांची गोळाबेरीज त्यांनी कधी केली नाही. मतदारसंघ आणि जनतेचा सर्वांगीण विकास हेच लक्ष आमदार निलेश राणे यांचे आहे. त्यांच्या याच विकासाच्या संकल्पनेतुन जनहिताच्या दृष्टीने चिंदर गावातील प्रलंबित व ग्रामस्थांची अत्यावश्यक गरज असलेली विकासकामे पूर्ण करण्यात आली असे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले.


सौजन्य | मालवण ब्यूरो

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स