माजी भारतीय कबड्डी कप्तान व प्रशिक्षक अर्जुन पुरस्कारप्राप्त अजय ठाकूर यांनी नारींग्रे गावच्या महाराष्ट्राच्या कबड्डीपटू सरिता कदम यांच्या राष्ट्रीय स्पर्धेतील चतुरस्त्र कामगिरीची केली प्रशंसा
माजी भारतीय कबड्डी कप्तान व प्रशिक्षक अर्जुन पुरस्कार प्राप्त अजय ठाकूर यांनी नारींग्रे गावच्या महाराष्ट्राच्या कबड्डीपटू सरिता कदम यांच्या राष्ट्रीय स्पर्धेतील चतुरस्त्र कामगिरीची केली प्रशंसा.
'खेलो मास्टर' राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या विजेत्या महाराष्ट्राच्या महिला संघाने बलाढ्य हिमाचल प्रदेश राज्य संघाला नमवत मिळवले सुवर्णपदक.
मसुरे | प्रतिनिधी : पंजाब राज्यातल्या चंदिगढ़ येथे २० मार्च २०२६ ते २२ मार्च २०२६ दरम्यान खेळल्या गेलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या नारींग्रे गावच्या सरीता कदम यांनी चमकदार कामगिरी केली. त्यांनी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत कर्णधार लीना डोलकर यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी केली. महाराष्ट्राच्या संघाने अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी हिमाचल प्रदेश राज्य संघाला २७. ९ गुणांनी पराभूत केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या नारिंग्रे गावच्या मूळ रहिवासी असलेल्या सौ. सरिता कदम यांनी अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघासाठी कमावलेले एकूण ११ गुण विजयासाठी निर्णायक ठरले.
यावेळी, भारतीय वरिष्ठ संघाचा माजी कॅप्टन तथा प्रो कबड्डी खेळाडू आणि प्रशिक्षक अर्जुन पुरस्कार प्राप्त अजय ठाकूर यांनी सरिता कदम यांची भेट घेतली आणि त्यांच्या चतुरस्त्र खेळाची विशेष प्रशंसा करत अभिनंदन केले.
मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र संघाला गौरविण्यात आले. महाराष्ट्र महिला संघात कर्णधार लीना डोलकर, उप कर्णधार मीना गायकवाड, सरिता कदम, कांचन गवळी, शिल्पा शिंदे, मालती गवळी, जया अग्रवाल, मनीषा गायकवाड या सर्वांनी छान खेळ केला. महाराष्ट्र संघाच्या या यशात संघ प्रशिक्षक दुर्वास धुळे, मार्गदर्शक अनिल जैन आणि संघ व्यवस्थापिका प्रीती टेमकर यांचा मोलाचा वाटा आहे. सर्व खेळाडूंना यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या महाराष्ट्र संघातील सर्व खेळाडूंना 'खेलो मास्टर्स गेम्स नॅशनल फाउंडेशन' तर्फे सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सौ. सरिता कदम यांना एक सुवर्णपदकाची कमाई कबड्डी क्रीडा क्षेत्रात लाभल्याने सिंधुवासियांना अभिमानाचे आहे व त्याबद्दल लवकरच त्यांचा विशेष सत्कार करण्यात येईल असे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषद संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी सांगितले, अशी माहिती मिळत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)