ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी सर्व राज्यांत 14567 राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक सुरु..!

ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी सर्व राज्यांत 14567 राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक सुरु..!

प्रकाशन: 01 Nov 2021 11:52 PM
वाचन संख्या 61

ओरोस | प्रतिनिधी : सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार मार्फत देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी सर्व राज्यांत 14567 राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात येत आहे. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाइन जनसेवा फौडेशनद्वारे चालविली जात आहे.ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक विश्वासार्ह राष्ट्रीय हेल्पलाईन तयार करुन ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे, हा या राष्ट्रीय हेल्पलाईनचा उद्देश .राष्ट्रीय हेल्पलाईन ही वयोवृद्ध व्यक्तींसाठी असून महाराष्ट्र राज्यामध्ये ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाईन जनसेवा फौडेशनद्वारे चालवली जात आहे. हेल्पलाईन ची वेळ सकाळी 8.00 वा ते संध्याकाळी 8.00 वा. असेल व वर्षातील 365 पैकी 361 दिवस सुरु राहणार आहे. यामध्ये 4 दिवस बंद असेल त्यामध्ये (26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोंबर आणि 1 मे महाराष्ट्र दिन) या दिवसांचा समावेश .या हेल्पलाईन मार्फत मिळणाऱ्या सेवा पुढीलप्रमाणे आहेत. माहिती- आरोग्य-जागरुकता, निदान, उपचार, निवारा / वृद्धाश्रम घरे, डे केअर सेंटर, पोषण विषयक, ज्येष्ठांसंबंधी अनुकूल उत्पादने, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कला करमणूक इ. मार्गदर्शन- कायदेविषयक (वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर दोन्ही), विवाद निराकरण (मालमत्ता, शेजारी इ.) आर्थिक, पेन्शन संबंधित, सरकारी योजना इ. भावनिक समर्थन- चिंता निराकरण, नातेसंबंध विषयक व्यवस्थापन, मृत्यूशी संबंधित शोक, जीवन व्यवस्थापन (वेळ, ताण, राग व्यवस्थापन, मृत्यूपूर्वीचे दस्तऐवजीकरण इ.). क्षेत्रीय पातळीवर मदत – बेघर, अत्याचार ग्रस्त वृद्ध, ज्येष्ठा हरवलेले व्यक्तींची सेवा व काळजी . या हेल्पलाईनसाठी जिल्हा पातळीवर क्षेत्रीय प्रतिनिधी (FRO) नियुक्त केलेले आहेत. तरी ज्येष्ठ नागरिकांची त्यांच्या समस्यांसाठी हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 14567 या क्रमांकावर संपर्क साधवा. जेणेकरुन वृद्ध व्यक्तीची योग्य ती मदत करुन त्यांची काळजी घेता येईल असे आवाहन स्मितेश शहा, प्रकल्प व्यवस्थापक यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स