सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात सिंधुदुर्ग जिल्हा कोकण विभागात अव्वल..!
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात सिंधुदुर्ग जिल्हा कोकण विभागात अव्वल..!
राज्यपालांच्या हस्ते होणार जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनानुसार निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक १०५. ८१ टक्के निधी संकलित.
सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : सशस्त्र सेना ध्वजदिन २०२४ निधी संकलनात सिंधुदुर्ग जिल्ह्याने कोकण विभागात पहिला क्रमांक प्राप्त केला आहे. राज्य सरकारच्या निर्धारित उद्दिष्टापेक्षा, सिंधुदुर्ग जिल्ह्याने अधिक १०५. ८१ टक्के निधी संकलित केला आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नियोजनातून जिल्ह्याने हे यश संपादन केले आहे. या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांना १० डिसेंबर रोजी मुंबईतील राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यास ४१. ४५ लाखांचे उद्दिष्ट दिले होते. जिल्हा प्रशासन, सैनिक कल्याण विभाग, विविध शाळा – महाविद्यालये, शासकीय - निमशासकीय कर्मचारी यांच्या उत्स्फूर्त सहभागातून जिल्ह्याने तब्बल ४३ लाख ६५ हजार इतका निधी गोळा केला.
या देशभक्तीपर समर्पित कामात, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, सहायक सैनिक कल्याण अधिकारी उमेश आईर, तसेच सैन्य कल्याण कार्यालयातील सर्व कर्मचार्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली तसेच विविध शिक्षण संस्था, कार्यालये व सर्व स्तरांवरील अधिकारी – कर्मचार्यांनी सहकार्य व योगदान दिले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या फार्मासिस्ट उमेश कोल्हे हत्या प्रकरणात पीडित कुटुंबाच्या वतीने ऍड. श्रीराम धोंडू चिंदरकर यांची नियुक्ती.
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...