श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त श्री दत्त मंदिर, भरड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन.
श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त श्री दत्त मंदिर, भरड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन.
मालवण : श्री दत्त जयंती उत्सव २०२५ निमित्त मालवण भरड येथील श्री दत्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:०० वाजता अभंग, नाट्यगीते यांचा 'स्वरानुभूती' कार्यक्रम होणार आहे. सादरकर्त्या प्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी, पुणे व सहगायिका सौ. रमा काजरेकर यांना श्री. भालचंद्र केळुसकर यांची ऑर्गनची साथ मिळणार असून चंद्रकांत निगडे (हार्मोनिअम साथ), प्रसाद मेस्त्री ( तबलासाथ) व प्रभूदास आजगांवकर (मृदुंगसाथ) यांचा साथ सहभाग असणार आहे.
गुरुवार, ४ डिसेंबर रोजी श्री. वासुदेव (बाळू) काजरेकर गुरुजी सायंकाळी ५:०० वाजता पुराण वाचन करणार आहेत. तसेच ह. भ. प. सौ. मेधा शेवडे यांचे सायंकाळी ५:३० वाजता कीर्तन होणार आहे. सायंकाळी ६:४५ वाजता श्री दत्त महाराजांचा जन्मोत्सव होऊन ७:४५ वाजता पालखी प्रदक्षिणा सोहळा व आरती होईल.
शुक्रवार, ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता बाळकृष्ण दशावतार नाट्यमंडळ, कोळंब - मालवण यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. शनिवार, ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ ते ८:३० रागेश्री पारकर पुरस्कृत 'भक्तिरंग' हा पारंपारिक शास्त्रीय भरतनाट्यम् नृत्याविष्कार सायली वाळके व मानसी पराडकर सादर करणार आहेत. तसेच रात्री १० वाजता 'कुर्ला टू वेंगुर्ला' हा मराठी चित्रपट दाखवण्यात येईल.
कार्यक्रमांना उपस्थितीचे आवाहन श्री दत्त मंदिर, भरड मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...