ताज्या बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
कट्टा येथील शिक्षक समीर चांदरकर व शिक्षिका सिमरन चांदरकर यांची राष्ट्रीय समृद्धी स्पर्धेसाठी निवड.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

कट्टा येथील शिक्षक समीर चांदरकर व शिक्षिका सिमरन चांदरकर यांची राष्ट्रीय समृद्धी स्पर्धेसाठी निवड.



कट्टा येथील शिक्षक समीर चांदरकर व शिक्षिका सिमरन चांदरकर यांची राष्ट्रीय समृद्धी स्पर्धेसाठी निवड.   

Article image

मसुरे | प्रतिनिधी : शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन आयोजित राज्यस्तरीय समृद्धी कार्यक्रम सन २०२५ - २६ अंतर्गत कला एकात्मिक अध्यापन शास्त्र स्पर्धेत सौ. सिमरन समीर चांदरकर (सहाय्यक शिक्षिका कट्टा) व श्री. समीर अशोक चांदरकर (कलाशिक्षक वराडकर हायस्कूल कट्टा) यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या दोन्ही शिक्षकांची राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या ठिकाणी ही स्पर्धा संपन्न झाली.


माध्यमिक स्तरावर समृद्धी स्पर्धा हा राष्ट्रीय स्तरावरील कला उत्सव कार्यक्रमाचा विस्तारीत कार्यक्रम आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या वतीने सन २०२५-२६ मध्ये आयोजित (दुसरे वर्ष) केला आहे. या अंतर्गत शिक्षकांना माध्यमिक स्तरावरील (इयत्ता नववी ते बारावी) अभ्यासक्रमाच्या क्षेत्रांवर सर्वोत्तम कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धती (best art integrated pedagogical practices) यावर आधारित सर्वोत्तम अध्ययन अध्यापन कृतींच्या सादरीकरणाची संधी मिळते. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP- २०२०) आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF-२०२३) या नुसार अभ्यासक्रमीय अध्ययनामध्ये कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतींचा अवलंब करणाऱ्या शिक्षकांचे योगदान ओळखणे आणि प्रोत्साहित करणे हा हेतू आहे. 


श्री. समीर चांदरकर व सौ. सिमरन चांदरकर यांनी या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत पिंगुळी येथील कळसुत्री बाहुल्यांच्या माध्यमातून इयत्ता नववीचा 'किं मिथ्या? किं वास्तवम?' हा पाठ सादर केला. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध विभागातून १५ गट सहभागी झाले होते. स्पर्धेचे परीक्षण डॉ. तापकीर, डॉ. इसावे, डॉ. सुवर्णा भुजबळ यांनी केले. श्री. अरूण जाधव, उपसंचालक सामाजिक शास्त्र, कला व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे, डॉ. कमलादेवी आवटे सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे, श्री. राहूल रेखावार (भा.प्र.से.) संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषत, महाराष्ट्र, पुणे कला व शास्त्र विभाग प्रमुख संघप्रिय वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स