आंगणेवाडी श्री भराडी देवी मंदिरात ओट्या भरण्याचा विधी जत्रोत्सवापर्यंत बंद.
आंगणेवाडी श्री भराडी देवी मंदिरात ओट्या भरण्याचा विधी जत्रोत्सवापर्यंत बंद.
मसुरे | प्रतिनिधी : प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मसुरे आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मंदिर येथे देव दिवाळीपासून (२१ नोव्हेंबर २०२५) जत्रोत्सवाच्या दिवसापर्यंत भाविकांच्या ओट्या भरण्याचा विधी प्रति वर्षी प्रमाणे बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये भाविकांच्या ओट्या देवालयात भरल्या जाणार नाहीत. भाविकांना देवीचे दर्शन नियमित वेळेनुसार मिळेल.
मसुरे, आंगणेवाडीतील श्री देवी भराडी देवीच्या वार्षिक जत्रोत्सवाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. सोशल मीडिया वरती जत्रा तारखे बाबत पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, तारीख निश्चित झाल्यानंतर अधिकृतरित्या आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या वतीने कळविण्यात येईल आणि दरम्यान भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...