ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात कोजागरी पौर्णिमा भक्तीभावात साजरी.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात कोजागरी पौर्णिमा भक्तीभावात साजरी.

प्रकाशन: 06 Oct 2025 08:52 PM
वाचन संख्या 104

अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात कोजागरी पौर्णिमा भक्तीभावात साजरी. 



अक्कलकोट | ब्यूरो न्यूज : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादप्रमाणे कोजागरी साजरी करण्यात आली. सायंकाळी ७ वाजता देवीच्या गर्भदेवालयाचे विधिवत पूजा करून द्वार उघडण्यात आले. यानंतर मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या अधिपत्याखाली पुरोहित मंदार महाराज पुजारी, व्यंकटेश पुजारी, मोहीत पुजारी, राघवेंद्र बागेवाडीकर व ब्रम्हवृंदांच्या वैदिक मंत्रोच्चारात प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते विधिवत लघुरुद्र करून देवीस महानैवेद्य व कोजागरी पौर्णिमेस मान असणारा मसाला दुधाचा प्रसाद दाखविण्यात आला. यानंतर मंदिर समितीच्या वतीने प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते दुध प्रसाद वाटप करण्यात आले. अनेक स्वामी भक्तांनी याप्रसंगी दुध प्रसादाचा लाभ घेतला. 

Article image

Article image


यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, उज्वलाताई सरदेशमुख, गिरीश पवार, सागर गोंडाळ, प्रसाद सोनार, संजय पवार, लखन सुरवसे, तुषार मोरे, ओंकार महाडीक, दर्शन घाटगे, स्वामीनाथ लोणारी, विपुल जाधव आदींसह भाविक उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स