ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
बेकायदेशीर मच्छिमारी करणारे तीन ट्राॅलर्स पकडले.

बेकायदेशीर मच्छिमारी करणारे तीन ट्राॅलर्स पकडले.

प्रकाशन: 09 Sep 2025 10:41 AM
वाचन संख्या 176

बेकायदेशीर मच्छिमारी करणारे तीन ट्राॅलर्स पकडले. 


मालवण | ब्यूरो न्यूज : आठवड्याभरापूर्वी राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी अनधिकृत मच्छीमारी करणाऱ्या ट्रॉलर्स वर कारवाई करा अशा प्रकारचे आदेश दिले होते. सिंधुदुर्गच्या समुद्रात बेकायदेशीर पर्ससीन मच्छीमारी करणाऱ्या ट्रॉलर्सचा वावर सुरू राहिल्याना पारंपरिक मच्छीमारांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर ८ सप्टेंबर रोजी, संध्याकाळनंतर मालवणच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली परवाना अधिकारी गणेश टेमकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धडक कारवाई करीत मालवण सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोरील समुद्रात अकरा वावाच्या आतमध्ये बेकायदेशीर मच्छीमारी करणाऱ्या रत्नागिरीचे तीन पर्ससीन ट्रॉलर्स पकडले. ह्या ट्राॅलर्सवर बांगडा व त्यासारखे अन्य मासे असल्याची माहिती मिळत आहे. 

Article image


 

पारंपरिक मच्छिमारांचे नेते पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी यांनी मालवण समुद्रात बेकायदेशीर पर्ससीन मच्छिमारी सुरु असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती.


सौजन्य | मालवण ब्यूरो 

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स