ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
कै. अरुण काशिनाथ बादेकर चॅरिटेबल ट्रस्टचे शैक्षणिक दातृत्व.

कै. अरुण काशिनाथ बादेकर चॅरिटेबल ट्रस्टचे शैक्षणिक दातृत्व.

कै. अरुण काशिनाथ बादेकर चॅरिटेबल ट्रस्टचे शैक्षणिक दातृत्व.


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण येथील कै. अरुण काशिनाथ बादेकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रेवतळे जि. प. प्राथमिक शाळेला दोन संगणक संच भेट देण्यात आले.

Article image


बादेकर ट्रस्टतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात, यातीलच एक भाग म्हणून शाळेला संगणक भेट देण्यात आले आहेत, असे अध्यक्ष गणेश बादेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष गणेश बादेकर, सचिव श्रीधर बादेकर, खजिनदार सौगंधराज बादेकर, सदस्य राजीव बादेकर, निनाद बादेकर, ललित चव्हाण, सचिन हडकर, स्वाती मसुरकर, संध्या मेस्त्री, मुख्याध्यापक देवीदास प्रभूगावकर, उपक्रमशील शिक्षक श्री. घोडगे आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी सौगंधराज बादेकर यांनी ट्रस्टच्या उपक्रमांबद्दल माहिती देताना सांगितले की, सामाजिक, शौक्षणिक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने ट्रस्टची निर्मिती करण्यात आली असून समाजातील सर्वसामान्यांना हक्काचा आधार देण्यासाठी ट्रस्टतर्फे कार्यक्रम घेण्यात येत आहेत.



मुख्याध्यापक प्रभूगावकर यांनी ट्रस्टचे आभार मानत सर्वसामान्यांना, गरीब कुटुंबियांना संगणकीय शिक्षणाचा फायदा राबविण्यात आलेला कौतुकास्पद असल्याचे सांगिलते. सूत्रसंचालन श्री. घोडगे यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स