सहा. मोटर वाहन निरीक्षक रोशन मुकुंद आचरेकर यांची मोटर वाहन निरीक्षक पदी पदोन्नती.
सहा. मोटर वाहन निरीक्षक रोशन मुकुंद आचरेकर यांची मोटर वाहन निरीक्षक पदी पदोन्नती.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवणचे सुपुत्र तथा सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले रोशन मुकुंद आचरेकर यांना मोटर वाहन निरीक्षक पदी पदोन्नती मिळाली असून त्यांची नियुक्ती अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे झाली आहे.
रोशन यांचे प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून मालवण व पुढील शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय सांगेली सिंधुदुर्ग येथे झाले आहे. तर इंजिनिअरिंगचे शिक्षण संगमेश्वर रत्नागिरी येथे झाले. २०१७ साली, स्पर्धा परीक्षेतून त्यांची नियुक्ती आरटीओ खात्यात सहायक मोटर वाहन निरीक्षक झाली होती. त्यांच्या पदोन्नतीचे जिल्ह्यातील आणि मालवणातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)