ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
बास्केटबॉल मिनीगट राज्य स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

बास्केटबॉल मिनीगट राज्य स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी.

प्रकाशन: 21 Aug 2025 07:25 PM
वाचन संख्या 266


अधिक माहितीसाठी सचिव अजय शिंदे यांच्याशी संपर्काचे आवाहन.


मालवण | ब्यूरो न्यूज :

महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशन आयोजित व सोलापूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन यांच्या नियोजनात सोलापुर शहरात, १० सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०२५ दरम्यान मिनी गट मुले व मुली बास्केटबॉल राज्य स्पर्धा होणार आहेत.

या राज्य स्पर्धेत सहभागी संघाच्या निवडीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनने टोपीवाला हायस्कूल मालवणच्या बास्केटबॉल मैदानावर शनिवार दिनांक २३/८/२०२५ रोजी दुपारी ३ वाजता निवड चाचणी होत आहे.


ज्या खेळाडूंची जन्म तारीख ०१/०१/२०१२ नंतरची असेल अशा खेळाडूंना या निवड चाचणी मध्ये सहभागी होता येईल. निवडचाचणी साठी येताना खेळाडूंनी सोबत आधार कार्ड व जन्म प्रमाणपत्र (मुळ प्रत), एक पासपोर्ट साईज फोटो सोबत घेऊन येणे अनिवार्य असल्याची माहिती मिळत आहे.


निवडचाचणी मध्ये जिल्ह्यातील बास्केटबॉल खेळाडूंनी पालक अथवा प्रशिक्षकांसोबत मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन अध्यक्ष श्री सुरेंद्र सकपाळ , कार्याध्यक्ष विजय मागाडे यांनी केले आहे.


याबद्दल अधिक माहितीसाठी सचिव अजय शिंदे (९४२२३९४१८६ ) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स