जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत जय गणेश इंग्लिश स्कूलचे यश.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण एज्युकेशन सोसायटीच्या जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल च्या सुलोचना पाटील मेमोरिअल हॉल मध्ये दिनांक २१ - ०८ - २०२५ रोजी संपन्न झालेल्या जिल्हा स्तर शालेय टेबल टेनिस स्पर्धेत मालवण एज्युकेशन सोसायटीच्या जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल, मालवण च्या १४ वर्षीय मुले व १७ वर्षीय मुलींच्या संघाने विजय संपादन केला.
हे दोन्ही संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. सर्व खेळाडूना क्रीडा प्रशिक्षक कोरगावकर, चंदू साळवी तसेच निशिकांत पराडकर, पंकज राणे यांचे मार्गदर्शन लाभले.
मालवण एज्युकेशन सोसायटी, मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि जय गणेश इंग्लिश मीडियम च्या सर्व पालकांनी सर्व मुलांचे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केलेले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)