श्री गणेशोत्सवापूर्वी ३ ट्रान्सफाॅर्मर कार्यान्वित होणार.
शहरातील वीज विषयी, शहर प्रमुख दीपक पाटकर यांची माहिती.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरातील कमी दाबाची वीज समस्या मार्गी लागावी यासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सिंधुरत्न योजने अंतर्गत मालवण शहरात मंजूर झालेले तीन विद्युत ट्रान्सफार्मर गणेश चतुर्थी पूर्वी कार्यान्वित होणार आहेत, अशी माहिती शिवसेना मालवण शहर प्रमुख दिपक पाटकर यांनी दिली आहे.
नागरिकांना अधिकाधिक सेवा सुविधा मिळण्यासाठी आमदार निलेश राणे सातत्याने प्रयत्नशील असतात. त्याच सेवेचा एक भाग म्हणून शहरातील फोवकांडा पिंपळ सोमवार पेठ मालवण, महाराजा हॉटेल नजीक एलआयसी ऑफीस जवळ, बोर्डींग ग्राऊंड टोपीवाला हायस्कूल मागे याठिकाणी हे तीन विद्युत ट्रान्सफार्मर मंजूर झाले असून कार्यान्वित होणार आहेत.
याबाबत दिपक पाटकर यांनी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांसोबत सिंधुरत्न योजना अध्यक्ष आमदार दिपक केसरकर व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे विशेष आभार मानले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)