ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
सिंधू रनर्सचा 'सावंतवाडी १२ तास रन' अनोखा उपक्रम.

सिंधू रनर्सचा 'सावंतवाडी १२ तास रन' अनोखा उपक्रम.

प्रकाशन: 14 Aug 2025 02:20 PM
वाचन संख्या 366


भारताचे प्रख्यात जलतरणपटू, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि टॅन झिंग नॉर्वे पुरस्कार विजेते रोहन मोरे, सावंतवाडी संस्थानचे युवराज श्री. लखम राजे भोसले, विविध क्षेत्रातील दिग्गज व मान्यवरांची उपस्थिती.


Article image


१५ ऑगस्ट २०२५ रोजी सावंतवाडी राजवाडा येथून रात्री ८ वाजता रनचा शुभारंभ.


सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून, सिंधू रनर टीमने, 'सावंतवाडी १२ तास' हा उपक्रम आयोजित केला आहे. 'सावंतवाडी १२ तास' या उपक्रमाच्या शुभारंभ निमित्त सिंधुदुर्ग टीमने कोकण तसेच महाराष्ट्रातील तमाम धावपटूंना सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. 'सावंतवाडी १२ तास रन पर्व चौथे 'वराह अवतार' या संकल्पने अंतर्गत हा उपक्रम असेल


या उपक्रमात धावपटूंना बारा तास / सहा तास तसेच तीन तास या विभागांमध्ये भाग घेऊन त्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता तपासता येणार आहे. या अभिनव उपक्रमामध्ये जिल्ह्यातून आणि जिल्हा बाहेरून अंदाजे ६० ते ८० धावक सहभागी होतील अशी अपेक्षा सिंधू रनर टीम व्यक्त करत आहे.


शुक्रवार, १५ ऑगस्ट २०२५ रोजी सावंतवाडी राजवाडा येथून रात्री ८ वाजता या रनला सुरुवात होईल आणि १६ ऑगस्ट, २०२५ सकाळी आठ वाजता या रनची सांगता सावंतवाडी राजवाडा येथे होईल.


या उपक्रमाला भारताचे प्रख्यात जलतरणपटू, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि टॅन झिंग नॉर्वे पुरस्कार विजेते श्री. रोहन मोरे यांची उपस्थिती प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहे. तसेच सावंतवाडी संस्थानचे युवराज श्री. लखन राजे भोसले यांचीही उपस्थिती असणार आहे. सावंतवाडी सारख्या सांस्कृतिक, कला आणि क्रीडा क्षेत्राचा वारसा लाभलेल्या आणि निसर्ग संपन्नतेने नटलेल्या शहरांमध्ये धावपटूंना स्वतःची शारीरिक आणि मानसिक क्षमता तपासण्याची ही उत्तम संधी सिंधू रनर टीमने उपलब्ध करून दिली आहे. बारा तास, सहा तास आणि तीन तास विभागामधील सहभागी धावकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात येईल.


सिंधू रनर टीमने आता पर्यंत सावंतवाडी १२ तास रन ४ वेळेस, गोवा ते सावंतवाडी १०० किलोमीटर रन ३ वेळेस, मालवण ते सावंतवाडी आरमार रन ४ वेळेस, २४ तास स्टेडियम रन, हिमालयन खारडुंगला अल्ट्रा रन ७२ किलोमीटर, देहू ते पंढरपूर २६६ किलोमीटर, टाटा अल्ट्रा मॅरेथॉन, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन, पुणे अल्ट्रा मॅरेथॉन, जम्पिंग गोरिला ट्रेल रन, लोकमत मॅरेथॉन, ठाणे हाफ मॅरेथॉन, टाटा मुंबई मॅरेथॉन, वसई विरार मॅरेथॉन, अदानी अहेमदाबाद मॅरेथॉन, गोवा रिव्हर मॅरेथॉन अशा अनेक रन मध्ये भाग घेऊन आपल्या जिल्याह्याचे नाव जगभरात गाजवले आहे.


यापूर्वी, साऊथ आफ्रिका येथे झालेल्या जगप्रसिद्ध कॉम्रेड मॅरेथॉन मध्ये यावर्षी सिंधू रनर टीमच्या प्रसाद कोरगावकर आणि ओंकार पराडकर या दोन धावपटूंनी देशाचे प्रतिनिधित्व करून जिल्ह्याचे आणि देशाचे नाव जगभरात पोचवले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स