कबुलायतदार गावकर जमिनीचे वाटप लवकरच होईल.
कबुलायतदार गावकर जमिनीचे वाटप लवकरच होईल.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची आंबोलीत माहिती.

सावंतवाडी । ब्यूरो न्यूज : आंबोली, चौकूळ व गेळे येथील कबुलायतदार जमिनींवरील वन विभागाची नोंद रद्द करून सदर जमिनी लवकरच वाटपासाठी उपलब्ध करून देणार, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंबोली येथे दिली. बावनकुळे खासगी दौऱ्यासाठी आंबोलीमध्ये आले असता आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनी कबुलायतदार जमीन प्रश्न ३० वर्षे प्रलंबित राहिल्यामुळे ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाबाबतचे निवेदन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले.
यावेळी आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर, आंबोली प्रमुख गावकर श्री. शशिकांत गावडे, आंबोली तंटामुक्ती अध्यक्ष श्री. उल्हास गावडे, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, सर्कल श्री यादव , तलाठी मुळीक व इतर महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)