मुणगे येथे वृक्ष रक्षाबंधन.
मसुरे | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील मुणगे करिवणे शाळेत पर्यावरण संवर्धन उपक्रमा अंतर्गत, विद्यार्थ्यांनी झाडाला राखी बांधून रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला. यावेळी शिक्षक प्रविण सावरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून मुलांमध्ये निसर्गाविषयी प्रेम, जबाबदारीची जाणीव व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना वृक्षाचे महत्त्व पटवून देणे आणि त्याचे संरक्षण करण्याची प्रतिज्ञा घेणे हा होता. यावेळी शिक्षक श्री. प्रविण दत्तात्रय सावरे
स्वयसेविका श्रीम. चंदना मेस्त्री
अंगणवाडी सेविका श्रीम. दिपीका बागवे,मदतनीस श्रीम. अश्विनी मुणगेकर
श्रीम. रिया सावंत आणि ग्रामस्थ उपस्थित होते
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)