ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या नारळ लढविणे स्पर्धेत ३१५ महिलांचा उत्साही सहभाग.

मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या नारळ लढविणे स्पर्धेत ३१५ महिलांचा उत्साही सहभाग.

प्रकाशन: 09 Aug 2025 10:00 PM
वाचन संख्या 470


आमदार निलेश राणे, पद्मश्री परशुराम गंगावणे व मान्यवरांची उपस्थिती. 


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या वतीने नारळी पौर्णिमा उत्सवानिमित्त मालवण बंदर जेटी येथे आयोजित नारळ लढवणे स्पर्धेत नेहा नामदेव केळुसकर विजेत्या ठरल्या त्यांना सोन्याची नथ, पैठणी, १० लाखाचा विमा आणि आयुर्वेदिक स्किन केअर किट बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.


Article image


या स्पर्धेचे हे दहावे वर्ष असून या दशकपूर्ती सोहळ्याला पद्मश्री परशुराम गंगावणे आणि अभिनेते विरेश कांबळी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावर्षी स्पर्धेत विक्रमी ३१५ महिलांनी सहभाग घेतला.


कार्यक्रमाची सुरुवात आमदार निलेश राणे आणि अभिनेते विरेश कांबळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. यानिमित्त सिंधुरत्न महिला फुगडी ग्रुपने फुगडी आणि गोफनृत्य सादर केले, तर स्थानिक बालकलाकारांनी कोळी आणि लावणी नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. यात विभूती ढोके, स्वराली मोरे, माही पारकर, मंत्रा कोळंबकर आणि हर्षाली पाडगावकर यांचा समावेश होता. तसेच बाल जादूगार निखिल विशाल ओटवणेकर यांनी सादर केलेल्या जादूच्या प्रयोगांनी प्रेक्षकांना थक्क केले.


यावेळी पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी मंडळाच्या सांस्कृतिक परंपरा जपण्याच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. तर अभिनेते विरेश कांबळी यांनी या उत्सवाला सागरदेवतेचा आशीर्वाद असल्याचे सांगत आयोजकांच्या मेहनतीचे कौतुक केले. सुगंधा साटम यांनी मंडळाने बालकलाकारांना दिलेली संधी आणि व्यासपीठाचे कौतुक केले.

या स्पर्धेत धावपटू लीना धुरी यांनीही सहभाग घेतला.


या कार्यक्रमात आमदार निलेश राणे, माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, उद्योजक व ज्येष्ठ जिल्हा नेते दत्ता सामंत, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सुगंधा साटम, उमेश नेरुरकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, हरी खोबरेकर, मिलिंद मेस्त्री, बाबा परब, जॉन नहोना, परशुराम पाटकर, राजू बिडये, बाबी जोगी, दिलीप घारे, आप्पा चव्हाण, लायन्स क्लबच्या अध्यक्षा अनुष्का चव्हाण, राधिका मोंडकर, मनाली दळवी, सोनाली पाटकर, पुनम चव्हाण, वैशाली शंकरदास यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.


स्पर्धेच्या अंतिम फेरीत द्वितीय क्रमांक पल्लवी दयानंद शिर्सेकर यांनी पटकाविला त्यांना सोन्याची नथ, पैठणी, १० लाखांचा विमा, तृतीय क्रमांक विजेत्या भाग्यश्री भिवा माळकर यांना चांदीचे पैंजण, पैठणी, चौथा क्रमांक तरण्णूम बांगी यांनी मिळविला त्यांना चांदीचे पैंजण, पैठणी देऊन गौरविण्यात आले. शुभदा पराडकर यांना लकी ड्रॉमध्ये मोबाईल मिळाला.


मंडळाच्या सल्लागार ॲड. अमृता मोंडकर आणि विद्या फर्नांडिस यांच्या योग्य नियोजनामुळे या कार्यक्रमाला भव्य स्वरूप आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पाडगावकर, देवानंद लुडबे आणि रेश्मा खंदारे-नागवेकर यांनी केले.


या कार्यक्रमास अध्यक्ष अरविंद मोंडकर, सदस्य देवानंद लुडबे, जेम्स फर्नांडिस, गणेश पाडगावकर, विद्या फर्नांडिस, रेश्मा नागवेकर, आर्या मुणगेकर, कोळंब सरपंच सिया धुरी, वायरी उपसरपंच प्राची माणगावकर, योगिता कुबल, मंडळाच्या सल्लागार ॲड. अमृता मोंडकर, स्नेहल मेथर, ममता कुबल, केदार केळुसकर, भूषण खोत, शुभदा पाडगावकर, प्रतिभा मोंडकर, पराग माणगावकर, यतीन खोत मंडळाचे बालपदाधिकारी हर्षाली पाडगावकर, सारा फर्नांडीस, अवनिश मेथर, आर्यन कुबल, नील नागवेकर आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स