भाजपच्या महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा उत्साहात.
भाजपच्या महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा उत्साहात.
वृतिका कोयंडे विजेत्या.
मालवण | प्रतिनिधी :
नारळी पौर्णिमेचं औचित्य साधत भारतीय जनता पार्टीच्या वतीने येथील बंदर जेटी येथे महिलांसाठी आयोजित नारळ लढविणे स्पर्धेत दांडी येथील वृतिका कोयंडे विजेत्या ठरल्या. त्यांना मान्यवरांच्या हस्ते रेफ्रिजरेटर देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेला महिलांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद लाभला.

या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, अशोक सावंत, बाबा परब, शहराध्यक्ष बाबा मोंडकर, दीपक पाटकर, भाजप महिला शहराध्यक्ष अन्वेषा आचरेकर, महिमा मयेकर, वैष्णवी मोंडकर, राणी पराडकर, दिव्या कोचरेकर, सौ. निवेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेत द्वितीय विजेत्या मनीषा पराडकर यांना वॉशिंग मशीन, तृतीय विजेत्या गार्गी सोनवडेकर यांना फॅन बक्षीस देस मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
लकी ड्रॉ मध्ये द्वितीय क्रमांक विजेत्या लतिका शिर्सेकर यांना कुंकवाचा करंडा, तृतीय क्रमांक विजेत्या सुलक्षणा वर्मा यांना चांदीचा छल्ला बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)