ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
मालवणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व बंड्या सरमळकर मित्र मंडळ आयोजित नारळ लढवणे स्पर्धा उत्साहात.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व बंड्या सरमळकर मित्र मंडळ आयोजित नारळ लढवणे स्पर्धा उत्साहात.

प्रकाशन: 09 Aug 2025 08:20 PM
वाचन संख्या 371


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व बंड्या सरमळकर मित्र मंडळ आयोजित नारळ लढवणे स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेत सलोनी खवणेकर अंतिम विजयी ठरल्या


Article image


स्पर्धेच्या व्यासपिठावर शिवसेना माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना तालुकासमन्वयक मंदार ओरसकर, महिला आघाडी तालुका संघटक दीपा शिंदे, तालुका समन्वयक पूनम चव्हाण, युवतीसेना जिल्हाप्रमुख निनाक्षी मेतर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.


यावेळी महिला तालुका पदाधिकारी यांच्या वतीने विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली. यामध्ये नारळ लढवणे, लहान मुलांचे वेशभूषा, लकी ड्रॉ स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच खास प्रेक्षक वर्गालाही लकी ड्रॉ चे आयोजन देखील करण्यात आले होते. यावेळी विजेत्या प्रथम क्रमांक सलोनी खवणेकर स्पर्धकास सोन्याची नथ, द्वितीय क्रमांक विजेत्या स्पर्धकास यतिका मयेकर टॉवर फॅन, तृतीय क्रमांक विजेत्या स्पर्धकास हेमांगी आचरेकर गॅस शेगडी, चतुर्थ क्रमांक विजेत्या दिशा पेडणेकर स्पर्धकास इस्त्री व प्रेक्षकातून विजेत्या पूर्वा आयरेकर स्पर्धकास पैठणी देण्यात आली. स्पर्धेतील तीन स्पर्धकांना आकर्षक पैठणी म्हणून बक्षिस देऊन सन्मानित करून गौरविण्यात आले.


वेशभूषा स्पर्धेतील लहान मुलांना खास आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रथम निशा धुरी, द्वितीय नक्ष घाडीगावकर, तृतीय गरिमा केळुसकर व उत्तेजनार्थ अस्मि भगत, आराध्या टेमकर यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.


यावेळी उपस्थित बंड्या सरमळकर, उमेश मांजरेकर, पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, श्वेता सावंत, रूपा कुडाळकर, भाग्यश्री लाकडे खान, सचिन मालवणकर, सिद्धेश मांजरेकर, अन्वय प्रभू, किरण वाळके, हेमंत मोंडकर, मनोज मोंडकर, माधुरी प्रभू, नीना मुंमबरकर, रश्मी परुळेकर, नरेश हुले, महेश जावकर, सोनाली डीचवलकर, दादा जोशी, गणपत आडिवरेकर, चिंतामणी मयेकर, भगवान लुडबे, मंदा जोशी, अक्षय भोसले, चंदू खोबरेकर, नारायण रोगे, रवी मिटकर, तृप्ती मयेकर, राहुल जाधव, सुधीर चिंदरकर, प्रथमेश सरमळकर, विशाल सरमळकर, भार्गव खराडे, संदेश लाड, यशवंत गावकर, प्रसाद चव्हाण, दीपक देसाई, लक्ष्मी पेडणेकर, गौरव वेर्लेकर, दादा पाटकर, प्रथमेश बिरमोळे, पूजा तळाशीलकर, किशोर गावकर, सुर्वी लोणे, गजा नेवाळकर, राधिका मोंडकर आदी उपस्थित होते.








विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स