ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व बंड्या सरमळकर यांच्यावतीने नारळी पौर्णिमेनिमित्त महिलांची खुली नारळ लढवणे स्पर्धा.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व बंड्या सरमळकर यांच्यावतीने नारळी पौर्णिमेनिमित्त महिलांची खुली नारळ लढवणे स्पर्धा.

प्रकाशन: 08 Aug 2025 12:30 PM
वाचन संख्या 468


मालवण | ब्यूरो न्यूज : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व बंड्या सरमळकर यांच्यावतीने नारळी पौर्णिमेनिमित्त महिलांची खुली नारळ लढवणे स्पर्धा ८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता मालवण बंदर जेटी येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक सोन्याची नथ व पैठणी, द्वितीय पारितोषिक आकर्षक बक्षीस व पैठणी, तृतीय पारितोषिक आकर्षक बक्षीस व पैठणी व इतर आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. खास आकर्षण म्हणून सुरेल बँजो पार्टी यांचे वादन होणार आहे. तसेच लकी ड्रॉ असणार आहे. यावेळी १२ वर्षांखालील मुले - मुलींसाठी वेशभूषा स्पर्धा नारळी पौर्णिमा (कोळी) या थीमवर होणार आहे, अशी माहिती शिवसेना महिला उपतालुकाप्रमुख निना मुंबरकर यांनी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तालुका कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुंबरकर बोलत होत्या. 


Article image


यावेळी तालुका समन्वयक पूनम चव्हाण, शहर संघटक रश्मी परुळेकर, तालुका संघटक दीपा शिंदे, युवतीसेना जिल्हाप्रमुख निनाक्षी मेथर, युवतीसेना तालुका संघटक भाग्यश्री लाकडे खान, उपतालुकाप्रमुख युवतीसेना रूपा कुडाळकर, लक्ष्मी पेडणेकर, राधिका मोंडकर, मंदा जोशी, कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्या सोनाली डीचवलकर, शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहरप्रमुख यशवंत गावकर, दत्ता पोईपकर, मडये आदी उपस्थित होते.


नारळी पौर्णिमेनिमित्त महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धा २०२५ आणि लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा (१२ वर्षांपर्यंत) याचे उद्घाटन दुपारी ३ वाजता माजी आमदार वैभव विजय नाईक आणि परशुराम उपरकर, तसेच माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रसिद्ध वकिल उल्हास कुळकर्णी, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. 


स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी भाग्यश्री लाकडे ९२०९१४५९३९, विद्या फर्नांडीस, नीना मुंबरकर, रुपा कुडाळकर यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती मिळत आहे..

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 297

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स