नारळी पोर्णिमेला आमदार निलेश राणे मच्छिमार, व्यापारी यांच्यासह श्रीफळ अर्पण करणार.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची उपस्थिती.
शहरप्रमुख व माजी नगरसेवक दीपक यांची माहिती.

मालवण | ब्यूरो न्यूज : छत्रपती शिवरायांच्या काळापासूनची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मालवणात, नारळी पौर्णिमा मंगलमय उत्साहात साजरी होते. किल्ले सिंधुदुर्ग वरून दर्याला मानाचे सुवर्ण श्रीफळ अर्पण झाल्यानंतर मालवण बंदरजेटी येथे शहरातील मच्छिमार, व्यापारी आणि नागरिक सागराला श्रीफळ अर्पण करतात. मालवण व्यापारी बांधव बाजारपेठ हनुमान मंदिर येथून पारंपरिक वाद्य मिरवणूकीने येतात. श्रीफळ पूजन होते.

यंदा, या सोहळ्यात सहभागी आमदार निलेश राणे सहभागी होत असून, सागराला श्रीफळ अर्पण करणार आहेत.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचीही उपस्थिती यावेळी असणार आहे.
मालवण शहर प्रमुख दिपक पाटकर यांनी याबद्दल माहिती दिली असून सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना मालवण शहरप्रमुख दिपक पाटकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)