जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत नारळ लढविणे स्पर्धेचा शुभारंभ
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत नारळ लढविणे स्पर्धेचा शुभारंभ
आचरा | ब्यूरो न्यूज : शिवसेनेतर्फे आचरा तिठा येथे आयोजित नारळ लढविणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे अमर गावकर विजेते तर राजा सावंत उपविजेते ठरले. विजेत्यांना रोख रक्कम व चषक देवून गौरविण्यात आले.

या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी आपले सण, परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम अशा स्पर्धा मधून होत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी उपजिल्हा प्रमुख महेश राणे, तालुका प्रमुख विनायक बाईत, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, जयप्रकाश परुळेकर, मुझफ्फर मुजावर, मनोज हडकर, भाऊ हडकर, अभिजित सावंत, बाबू कदम, उदय घाडी, ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर, महेंद्र घाडी, चंदू कदम, किशोरी आचरेकर, तसेच हर्षद धुरी, किशोर हिर्लेकर, शशिकांत नाटेकर, बाईत तसेच बहुसंख्य शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी श्री. सामंत यांच्या हस्ते पत्रकार आणि जेष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)