ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याची प्रवासी संघटनेची मागणी.

खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याची प्रवासी संघटनेची मागणी.

प्रकाशन: 31 Jul 2025 05:59 PM
वाचन संख्या 177


खारेपाटण | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वार असलेले खारेपाटण रेल्वे स्टेशन विविध समस्यांच्या विळख्याने ग्रासलेले असून या स्टेशनला सुव्यवस्थित प्लॅटफॉर्म नसल्यामुळे प्रवासी वर्गाचे हाल होत आहेत. प्रवासी संघटना व ग्रामस्थांच्या वतीने प्लॅटफॉर्म उंचीकरण करण्याबाबत लेखी पत्रव्यवहार करण्यात आला असून रेल्वे प्लॅटफॉर्म मंजूरी मिळाल्याचे समजते. तरी देखील अधिकाऱ्यांचे उदासीनतेमुळे कामास दिरंगाई होत असल्याचा आरोप व संताप खारेपाटण रेल्वे स्टेशनची पाहणी करण्याकरिता आलेल्या कोकण रेल्वेचे अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांनी व्यक्त केला.


Article image


चिंचवली येथील खारेपाटण रोड रेल्वे स्टेशनच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी व स्थानिक ग्रामस्थ व प्रवासी संघटना यांच्याशी चर्चा करण्यासाठी बुधवार, ३० जुलै रोजी कोकण रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य पर्यवेक्षक अधिकारी श्री. मधुकर मातोंडकर, वरिष्ठ खंड अभियंता श्री. चिन्मय भंडारे, जी.पी.प्रकाश (वरिष्ठ अधिकारी), विभगिय सुपरवायजर व्हीं. डी. सामंत खारेपाटण रोड रेल्वे स्टेशनला आले होते. त्यांच्या समवेत स्टेशन मास्टर श्री. भूषण फाटक उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थानी प्रवासी संघटनेचे जिल्हा समिती सदस्य श्री. संतोष राणे, सुरेश सावंत यांच्या समवेत खारेपाटण रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म उंचीकरण करण्याबरोबर विविध समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.


यावेळी खारेपाटण सरपंच सौ. प्राची इस्वलकर, माजी सरपंच इस्माईल मुकादम, चिंचवली सरपंच अशोक पाटील, माजी सरपंच अनिल पेडणेकर, खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन दशक्रोशी संघर्ष समितीचे सचिव सूर्यकांत भालेकर, खारेपाटण रेल्वे स्टेशन समन्वय समिती प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्री. रमेश जामसंडेकर, सामजिक कार्यकर्ते विजय देसाई, संतोष पाटणकर, खारेपाटण रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शेखर शिंदे, उपाध्यक्ष संतोष तुरळकर, नडगिवे उपसरपंच भूषण कांबळे, मोसम ग्रा.पं. सदस्य पांडुरंग कोकरे, अरुण कर्ले, बबन तेली, चींचवली पोलीस पाटील दिगंबर भालेकर, विवेक ब्रम्हदंडे, पन्हाळे येथील चव्हाण आदी मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.


यावेळी खारेपाटण रेल्वे स्टेशन करीता प्लॅटफॉर्मची उंची वाढविणे, तुतारी, कोकणकन्या व मांडवी एक्स्प्रेस आदी गाड्या थांबविणे, स्टेशनकडे जाणारा रस्ता चांगला बनविणे, स्टेशन परिसरात पुरेशा लाईटची व प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करणे, रेल्वे प्रवाशांना संगणक आरक्षण खिडकी उपलब्ध करून देणे, हॉलिडे स्पेशल गाड्या खारेपाटण स्टेशनला थांबविणे, रेल्वे स्टेशन परिसरात अधिकृत रिक्षा स्टँड निर्माण करणे या बाबी मांडण्यात आल्या.


खारेपाटण रोड रेल्वे संघर्ष समिती, खारेपाटण प्रवासी संघटना समन्वय समिती तसेच खारेपाटण ग्रामपंचायत व रिक्षा संघटना खारेपाटण यांच्या वतीने विविध मागण्यांचे लेखी निवेदन कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आले. तर सदर कामे गणेश चतुर्थी पूर्वी पूर्ण करण्यात यावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. ही कामे वेळेत पूर्ण न केल्यास ग्रामस्थांच्या वतीने प्रवासी समन्वय समितीच्या वतीने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन विरोधात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा खारेपाटण सरपंच सौ. प्राची ईस्वलकर, संघर्ष समितीचे सचिव सूर्यकांत भालेकर व प्रवासी समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश जामसंडेकर यांच्या मार्फत अधिकाऱ्यांना देण्यात आला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स