ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग तर्फे रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी अध्यक्षपदी सिद्धेश सावंत यांची नियुक्ती झाल्याने सत्कार.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग तर्फे रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी अध्यक्षपदी सिद्धेश सावंत यांची नियुक्ती झाल्याने सत्कार.

प्रकाशन: 31 Jul 2025 05:41 PM
वाचन संख्या 413


सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडीच्या अध्यक्षपदी व्हॉईस ऑफ मीडियाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष व युवा पत्रकार सिद्धेश सावंत यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ सल्लागार राजेश नाईक यांच्या हस्ते सिद्धेश सावंत यांना मायेची शाल प्रदान करण्यात आली. तसेच जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, कार्याध्यक्ष अनंत धोंड, सचिव शैलेश मयेकर, प्रसिद्धीप्रमुख दीपक पटेकर व सदस्य साबाजी परब, शुभम सावंत तसेच पत्रकार रुपेश हिराप, प्रसन्न गोंदावळे यांच्या उपस्थितीत ग्रंथ, श्रीफळ प्रदान करून सिद्धेश सावंत यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


Article image


दरम्यान आगामी काळात आपण रोट्रॅक्ट क्लबच्या माध्यमातून तसेच व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या माध्यमातून जनमानसांच्या विविध समस्या सोडविण्याचे प्रामाणिक कार्य नक्की करू, असा विश्वास नूतन अध्यक्ष सिद्धेश सावंत यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक पटेकर यांनी केले तर आभार अनंत धोंड यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स