घुमडाई मंदिरातील भजन महोत्सवाचे भजन महर्षी भालचंद्र केळूसकर बुवा यांच्या हस्ते उद्घाटन.
मालवण | ब्यूरो न्यूज : श्री देवी घुमडाई मंदिरात श्रावणधारा महोत्सवा अंतर्गत भजनमहर्षी कै. पंढरीनाथ घाडीगांवकर स्मृतीप्रित्यर्थ नामांकित भजनी बुवांचा भजन महोत्सव शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत पुरस्कृत व घुमडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे हे ११ वे वर्ष असून हा महोत्सव १९ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भजन महर्षी भालचंद्र केळूसकर बुवा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
दत्ता सामंत यांच्या सामाजिक, तसेच सांस्कृतिक व कला क्षेत्रातील दातृत्वाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
यावेळी भाऊ सामंत, शिवसेना शहर प्रमुख दिपक पाटकर, बाबू बिरमोळे, योगेश पांचाळ, वैकुंठवासी चिंतामणी पांचाळ बुआ घोटगे स्मारक बांधकाम कमिटी अध्यक्ष निलेश ठाकुर, सुधीर वस्त, दिलीप बिरमोळे, राजा सामंत, गोपी लाड, मंदार लुडबे, योगेश सामंत, बाळा माने, शानू वालावलकर, धोंडी नाईक, आबा बिरमोळे, भाई बिरमोळे, प्रशांत बिरमोळे, गजा खोत, भाऊ मोरजे यांसह घुमडे ग्रामस्थ व भजनप्रेमी उपस्थित होते. यावेळी बुआ वैभव सावंत, बुआ दुर्वास गुरव यांचे भजन सादर झाले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)