मालवणात युवा - युवतीसेनेच्या वतीने महाविद्यालयीन युवतींसाठी ३१ जुलै रोजी आरोग्य शिबीर.
मालवण | ब्यूरो न्यूज : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा - युवतीसेनेच्या कार्यकारिणी सदस्य रुचि राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण शहरातील महाविद्यालयीन युवतींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन गुरुवार, ३१ जुलै रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १:०० या वेळेत स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे करण्यात आले आहे. महाविद्यालयीन युवतींनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक युवतीसेना सिंधुदुर्ग जिल्हा विस्तारक विद्या सरमळकर, युवतीसेना जिल्हाध्यक्ष निनाक्षी शिंदे- मेतर, तालुकाध्यक्ष भाग्यश्री लाकडे खान, युवासेना मालवण तालुका समन्वयक मंदार ओरोसकर, युवासेना शहरप्रमुख सिद्धेश मांजरेकर व युवा-युवतीसेना पदाधिकारी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)