एक 'अनमोल इमेज' झाली डिलीट....!
१९९४/१९९५ साल. मालवण शहरात बाबा (अरूण) उर्फ पप्पा पांगे यांच्या हाॅटेलचा शुभारंभ झाला आणि तिथल्या विविध पदार्थांसोबत काऊंटरवरची हल्क होगनची इमेज बघत बघत त्याच्या 'डब्ल्यू डब्ल्यू एफ' मधील कहाण्या ऐकणं आणि ऐकवण्याच्या फैरी झडत असत. केबल धारकांना तो माहीत होता परंतु आमच्यासारख्या दूरदर्शन बघ्या बालकांना त्याच्या बद्दलचं सगळं अगदी अप्रूपाचं वाटत असे.. ! मालक पांगेशी बोलायच्या बहाण्याने काचेतून दिसणारी काऊंटरवर त्याची इमेज, प्रत्येक वेळी न्याहाळत असताना त्याच्या बद्दलचा दरारा आणखी वाढत होता हे मात्र खरं..! 'हा बाबा पांगेंचा मित्र आहे आणि मुंबईत पांगेंच्या मुंबईतील घरी तो येतो जातो,' अशा गंमतशीर अफवाही खोट्या आहेत हे कळूनही, 'सत्य' भासायच्या.
हल्क होगन जायची माहिती मिळाली आणि त्याची मनात असलेली 'अनमोल हाॅटेलच्या काऊंटरवरची ही इमेज' डिलिट फाॅर ऑल झाल्यासारखं वाटलं..!
बलाची उपासना आणि व्यायामाचा जाहीर जागर केलेल्या 'हल्कला' कोणी 'हलक्यात' घेऊ शकत नव्हतं..आणि नाही हेच खरं.
सुयोग पंडित. मालवण.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)