ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
'खेड्यांकडे वळा' गांधीजींच्या या विचारांचा विचार होणार का? : अण्णा पवार

'खेड्यांकडे वळा' गांधीजींच्या या विचारांचा विचार होणार का? : अण्णा पवार

प्रकाशन: 27 Oct 2021 03:08 PM
वाचन संख्या 60
शिरगाव | संतोष साळसकर : महात्मा गांधीना, समाजाला बोधीत करण्यामागे एकच उद्देश होता, की, खेडे हा देशाच्या विकासाचा मुख्य कणा आहे.  देशाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर प्रथम खेड्यांचा विकास केला पाहिजे. हा महात्मा गांधीजींच्या बोलण्याचा आशय असलेल्या संकल्पनेकडे जनतेनेच नाही, तर सरकारने सुद्धा दुर्लक्ष केलेला आज आपण पाहत आहोत. याचा शासनदरबारी विचार होण्यासाठी अधिकारी व राज्यकर्ते यांनी जोर धरावा. तरच २ ऑक्टोबर हा गांधी जयंती दिन खर्‍या अर्थाने देशहिताने साजरा होईल. असे मत श्रावण येथील पेंटर व सामाजिक कार्यकर्ते अण्णा पवार यांनी प्रसिध्द पत्रकामधुन मांडले.
   खेड्यात उपजीविकेचे साधन नसल्याने, उद्योगधंदे उभारले तर खेड्यातील तरुणांचे, नोकरी प्रश्न सुटतील. नोकरीसाठी वणवण करत शहरांकडे जाणारा ओघ थांबेल. शहरांचे बिघडलेले वातावरण सुधारेल. खेड्यातील शाळांची पटसंख्या वाढेल. त्याचबरोबर तरुण आपल्या गावातच राहून शेती किंवा फळ लागवड करून आपल्या उपजीविकेच्या साधनांमध्ये आणखीनच भर घालून आर्थिक सुबत्ता आणतील. स्वतःची आर्थिक बाजू भक्कम करतील. त्याचबरोबर माळरानावर व डोंगर पठार किंवा उतारावर शेती केली तर पावसाचे पडणारे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होईल. शिवाय वन्यप्राण्यांचा होणारा त्रास लोकांना कमी होईल. आणि वन्यप्राण्यांना खाद्य निर्माण झाल्याने वन्य प्राणी लोकवस्तीकडे वळणार नाही. पर्यायाने वन्य प्राण्यांचा व लोकांच्या पाण्याचा प्रश्न मिटेल. पारंपरिक पद्धतीने चालणाऱ्या या रितीरिवाजाकडे शासनाने लक्ष घालून प्रथम खेड्यांचा विकास करावा. यासाठी स्थानिक कार्यकर्ते, सरपंच, आमदार,  खासदार मंत्री यांनी संघटित होऊन विचार करावा. असे मत श्रावण येथील पेंटर अण्णा पवार यांनी, प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून जनतेसमोर मांडले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 309

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स