ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्री देवी माऊली मंदिर रोणापाल परिसरातील साफसफाई दयासागर छात्रालयातील विद्यार्थ्यांनी श्रमदानातून केली

श्री देवी माऊली मंदिर रोणापाल परिसरातील साफसफाई दयासागर छात्रालयातील विद्यार्थ्यांनी श्रमदानातून केली

प्रकाशन: 11 Aug 2024 12:01 PM
वाचन संख्या 51

बांदा | राकेश परब

श्री देवी माऊली मंदिर रोणापाल परिसरातील साफसफाई दयासागर छात्रालय,रोणापाल वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी श्रमदानातून नुकतीच केली. सध्या सुरू असलेल्या सतत मुसळधार पावसामुळे श्री देवी माऊली मंदिर रोणापाल सभोवताली परिसरात चिखलाचे साम्राज्य, तसेच मोठ्या प्रमाणावर गवत तयार झाले होते. याची श्रमदानातून साफसफाई छात्रालयातील राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली या छात्रालयाचे प्रमुख जीवबा वीर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी केली.

यावेळी या विद्यार्थ्यांना श्री. देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ यांचे सहकार्य लाभले यावेळी मंडळाचे प्रकाश गावडे,मंगेश गावडे, बाबल तुयेकर, विष्णू सावंत,वामन गावडे,उदय गावडे,मोहन गावडे, परशुराम गावडे,प्रदिप नाईक,सचिन कुबल, उपस्थित होते. यावेळी छात्रालयाच्या ५० मुलांनी या श्रमदानात सहभाग घेतला. सांस्कृतिक मंडळाच्या सदस्यांनी मुलांना अल्पोपहार ची सोय केली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स