सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संकेत पाडलोकर यांच्या कडून शांताराम उर्फ बाळा आकेकर यांचा सन्मान
बांदा | राकेश परब
समाजातील आणि राजकारणातील कणखर नेतृत्व करणारे व्यक्तीमत्व शांताराम उर्फ बाळा आनंद आकेरकर यांचा संकेत पाडलोकर यांनी नुकताच आनंदी मंगल कार्यालय सभागृहात पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर संकेत पाडलोसकर, भाजप महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, बांदा उपसरपंच बाळू सावंत, बांदा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, राकेश केसरकर, प्रवीण नार्वेकर, प्रवीण गाड, आदी मान्यवर उपस्थित होते.
संकेत पाडलोस्कर म्हणाले आपल्यासाठी तर सगळेच जगतात पण दुस-यांसाठी जगणारेआताच्या काळात मोजकेच असतात. त्याचच एक उत्तमउदाहरण म्हणजे आदरणीय श्री.बाळा आकेरकर बांदा ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच पद भूषविणारे आणि गेली २५ वर्ष अनेक सामाजिक संस्था यांची पदे सांभाळत आहे तसेच अनेकसमाज कार्यात धडपडणारे एक तेजस्वी अभ्यासू वृत्ती चे उदाहरण म्हणजे बाळा आकेरकर, ते पुढे म्हणाले त्यांचे साधे राहणीमान तसेच लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य एकनिष्ठेने बाळगणारेलोकांपर्यंत पोहचणारे, गावातील जनतेसाठी धडपडणारे व्यक्ती महत्व, व्यवसाय सांभाळून समाज सेवेत स्वतःला झोकून घेणारे असे काही नेमकेच लोकप्रतिनिधी पहायला मिळतात. राजकारणाचा रस असल्यामुळे राजकारणातजाऊन स्वतःचा ठसा उमटणारे आणि कधीही आपल्या पदाचा गैरवापर न करता सततलोकांप्रती निष्ठा बाळगणारे कणखर नेतृत्व करणारे बाळा आकेरकर.
त्याच प्रमाणे कलेला सुध्दातेवढेच जपणारे सांभाळणारे कलाकारांसाठी अनेक योजना राबवणारे व्यक्ती महत्व,आपल्या आयुष्यात अनेक चढ उताराचा सामना करून सुध्दा त्यांनी ही समाज सेवा सूरूच ठेवली त्यांच्या या कार्याल खरच सलाम असे संकेत पाडलोसकर म्हणाले. आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर त्यांनी अशीच गरुड़ झेप घ्यावी आणि आपल्या हातून गावाची अशीच सेवा चालू रहावी असे म्हणत त्यांचा सन्मान पत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)