ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
बांद्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत !

बांद्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत !

प्रकाशन: 01 Aug 2024 08:22 PM
वाचन संख्या 120

राकेश परब बांदा |

मुसऴधार पावसामुळे गुरुवारी पहाटे बांद्यात तेरेखोल नदीचे पाणी वाढले होते.हे पाणी नदीपात्राबाहेर येऊन नदीनजीकच्या आळावाडी मासळीमार्केटपुढे आल्याने मच्छामार्केट,शेर्ले मार्ग बंद होता.. सखल भागात आळवाडी मच्छी मार्केट मध्ये असल्याने दुपारीपर्यंत तेरेखोल नदीचे पाणी होते. बांदा बाजारपेठेत पाणी आले न आल्याने बाजारपेठ सुरळीत सुरु होती. गुरुवारी दुपारी पावसाने विश्रांती घेतल्याने पाणी नदीत गेले.  सायंकाळी बांदा आळवाडी मासळीमार्केटही नेहमीप्रमाणे सुरु होते.

बांदा आळवाडी तेथे पूराच्या पाण्यात कार फसल्याने पलीकडं जाण्याचा प्रयत्न चालकांच्या अंगाशी आला. मच्छीमार्केट  हा परिसर सखल  भागात असल्याने नेहमीच तेरेखोलचे पाणी घुसते. आज गुरुवारी सकाळी एका कारचालकाने शेर्लेत जाण्यासाठी पाण्यातून प्रवास करताना चालकाच्या अंगाशी आले. या पुराच्या पाण्यातून कार नेत असताना कार पाण्यात फसली. बांद्यातील युवकांनी समयसूचकता दाखवल्याने कारचालकाचा जीव वाचला. २०२१च्या पुराच्या जुन्या  कटु आठवणी लक्षात घेता व्यापाऱ्यांनी रात्रीच आपले सामान सुरक्षित स्थळी हलविले होते.  बांदा दशक्रोशीतील गावातील गावांमध्ये अती पाऊस पुराचे पाणी शेती बागायतीमध्ये घुसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.       

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स