ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्यमंत्री मत्स्य शेतकरी वीज योजना राबवा, मच्छीमार नेते रविकिरण तोरसकर यांची मागणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्यमंत्री मत्स्य शेतकरी वीज योजना राबवा, मच्छीमार नेते रविकिरण तोरसकर यांची मागणी

प्रकाशन: 01 Aug 2024 07:18 AM
वाचन संख्या 37

महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना घोषित केली आहे,त्याच धर्तीवर मुख्यमंत्री मत्स्य शेतकरी योजना राबवावी अशी मागणी भाजप सिंधुदुर्गचे मच्छिमार सेल जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी केली आहे. यासाठी सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

भारताच्या मत्स्य निर्याती मध्ये मत्स्य शेतीचा वाटा मोठा आहे परंतु यामध्ये महाराष्ट्र राज्य सतराव्या क्रमांक वर आहे.मत्स्य शेतकरी याचा उत्पादना वरील प्रमुख खर्च हा विजेवर होतो. त्यामुळे त्याचे नफ्याचे प्रमाण कायम कमी राहते. तसेच जागतिक हवामान बदल व नैसर्गिक आपत्ती पण नुकसानीस कारणीभुत ठरते.

महाराष्ट्रातील मत्स्य शेतीला बळ देण्यासाठी इतर राज्याप्रमाणे मत्स्य शेतकऱ्यांना संबंधित क्षेत्रात नियोजनबद्ध सवलती देणे आवश्यक आहे. यासाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजनेसारखीच मुख्यमंत्री मत्स्य शेतकरी वीज योजना राबविण्याची गरज आहे. विशेषतः सागरी किनारपट्टीवर केली जाणारी मत्स्य शेती यामध्ये कोळंबी पालन, गोड्या पाण्यातील पिंजऱ्या मधील मत्स्य शेती, तसेच शोभिवंत मत्स्यपालन यामध्ये मोठ्या प्रमाणात विजेची मागणी असते.

आज रोजी महाराष्ट्रामध्ये केल्या जाणाऱ्या मत्स्य शेती मधील वीज वापरावर सद्यस्थिती मध्ये कोणतेही अनुदान मिळत नाही.

मत्स्य शेतकऱ्यांचा समावेश मुख्यमंत्री मत्स्य शेतकरी वीज योजना घोषित केल्यास त्याचा परिणाम उत्पादन खर्चावर होऊन मत्स्य शेतीच्या नफ्यात वाढ होईल. त्यामुळे अधिकाधिक मत्स्य शेतकरी मत्स्य शेती करण्यास उद्युक्त होतील. ज्याचा फायदा भारताची सागरी मत्स्य पदार्थ निर्यात वाढवणे व रोजगार निर्मितीसाठी होईल.

शासनाने मत्स्य शेती व मत्स्य शेतकरी यांना बळ देण्यासाठी. मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना धर्तीवर, मुख्यमंत्री मत्स्य शेतकरी वीज योजना राबवावी अशी मागणी भाजप सिंधुदुर्गचे मच्छिमार सेल जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 282

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स