ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
3669 ओव्यांचा श्री गजानन विजयग्रंथ तोंडपाठ असलेल्या सुमतीताई बापट कालवश !

3669 ओव्यांचा श्री गजानन विजयग्रंथ तोंडपाठ असलेल्या सुमतीताई बापट कालवश !

प्रकाशन: 06 Nov 2023 09:44 PM
वाचन संख्या 197

नाशिक /प्रतिनिधी : सुमतीताई बापट या एक मध्यमवर्गीय गृहिणी होत्या.केवळ कुतूहलापोटी श्री गजानन विजय ग्रंथ वाचता वाचता त्या गजानन महाराजांच्या परमभक्त झाल्या.गजानन विजय ग्रंथाचे एकवीस अध्याय त्यातल्या 3669 ओव्यांसह त्यांना मुखोद्गत होते.हा एक स्मरणशक्तीचा आगळा चमत्कारच मानावा लागेल.नव्वदी पार केलेल्या सुमतीताईंनी कोविडकाळात शेकडो ऑनलाईन मुखोद्गत पारायणे केली.आपली सिंधुनगरीसाठी त्यांची एक आठवण अतिशय मौल्यवान आहे.

Article image

वैशाली पंडित यांच्या ,’ श्री गजानन विजय ग्रंथाचे साहित्यिक पारायण वंदनीय सुमतीताईंच्या हस्तेच त्यांच्याच निवासस्थानी झाले.वैशाली पंडित,श्रीनिवास पंडित यांच्या सूनबाई दीपाली पंडित यांनाही सुमतीताईंचे आशीर्वाद स्पर्श लाभले होते.प्रकाशनावेळी त्या अतिशय आनंदी होत्या.पुस्तकाला त्यांचा पवित्र स्पर्श झाला हे आपले भाग्य असल्याचे वैशाली पंडित सांगतात.स्मरणशक्तीचा एक लखलखीत अलंकार काळाच्या पडद्याआड गेला असला तरी त्याचे तेज मात्र जनमानसात झळाळतच राहील !

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स