ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे किल्ले सिंधुदुर्गवर साजरा होणार पर्यटन दिन
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे किल्ले सिंधुदुर्गवर साजरा होणार पर्यटन दिन

प्रकाशन: 26 Sep 2023 01:02 PM
वाचन संख्या 47

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर

सहसंपादक/ नवलराज काळे:भारत सरकार पर्यटन विभाग, पर्यटन व्यावसायिक महासंघ, तारकर्ली पर्यटन विकास संस्था तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या युवा टुरिझम क्लब तसेच ग्राम पर्यटन समिती अध्यक्ष व समिती सदस्य यांच्या माध्यमातून दि. २७ सप्टेंबर रोजी मालवणच्या किल्ले सिंधुदुर्गवर जागतिक पर्यटन दिन साजरा केला जाणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी दिली आहे.पर्यटन आणि हरित गुंतवणूक ही जागतिक पर्यटन वर्ष २०२३ ची जागतिक संकल्पना असून किल्ले सिंधुदुर्ग वर साजरा होणाऱ्या या पर्यटन दिनाच्या कार्यक्रमास भारत पर्यटन विभाग नवी दिल्ली च्या अधिकारी सौ.भावना शिंदे उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून भारत पर्यटन विभागामार्फत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्री. किशोर तावडे यांना भारत पर्यटन विभागामार्फत आमंत्रित करण्यात आले आहे. २७ सप्टेंबर रोजी या कार्यक्रमाची सुरवात सकाळी ९ वाजता स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण आयोजित श्री. भुजंग बोबडे यांचे संग्रहालय, पुरातत्व, सास्कृंतिक विषयावरील व्याख्यानाने होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता किल्ले सिंधुदुर्गवरील शिवराजेश्वर मंदिरामध्ये प्रमुख अतिथीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची विधिवत पूजा तसेच उपस्थितांना तसेच नव्याने स्थापन झालेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या युवा पर्यटन क्लब यांना सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल माहिती देण्यात येणार आहे. तसेच किल्ला परिसर क्लीन एण्ड ड्राइव मोहिम कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याचप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते तारकर्ली पर्यटन संस्थेच्या टुरिझम वेब पोर्टल चा छत्रपती शिवाजी महाराज मंदिरामध्ये उद्घाटन समारंभ होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विष्णू मोंडकर यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स