ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मराठा आरक्षण मुद्द्यावर जालन्यातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा सरकारचा निर्णय तर लाठीचार्ज प्रकरणातील ३ अधिकारी होणार निलंबीत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

मराठा आरक्षण मुद्द्यावर जालन्यातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा सरकारचा निर्णय तर लाठीचार्ज प्रकरणातील ३ अधिकारी होणार निलंबीत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

प्रकाशन: 11 Sep 2023 11:14 PM
वाचन संख्या 156

मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे असेही केले आवाहन.

मुंबई | ब्युरो न्यूज : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील चर्चेसंबंधी माहिती दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाची चिंता सरकारलाही आहे आणि सर्वपक्षीय बैठकीत इतर नेत्यांनी ती व्यक्त केली. राज्यात कायदा-सुव्यवस्था अबाधिता राहावी, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, ज्या-ज्या वेळी राज्यावर संकट आले तेव्हा सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठका यापूर्वीही झालेल्या आहेत. सुसंवाद व चर्चेतून सर्व स्तरांवर मार्ग निघू शकतो. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सर्वपक्षांनी ठराव पारीत केला असून मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेतले पाहिजे, असे नमूद करण्यात आलेलं आहे. त्यांनी जस्टीस शिंदे कमिटीला वेळ द्यावा, कमिटीमध्ये जरांगे पाटलांचे काही सदस्य येऊ इच्छित असतील तर तोही निर्णय घेतलेला आहे.

जालना येथील आंदोलकांवर जे गुन्हे आंदोलकांवर दाखल झालेले आहेत. ते गुन्हा मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. तशा सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. लाठीचार्जमध्ये जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाईची मागणी आंदोलकांनी केली होती. त्यानुसार एक उपविभागीय अधिकाऱ्याला निलंबित केलं होतं. आंदोलकांची मागणी तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची होती. त्यानुसार खाडे, आघाव आणि आणखी एक अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचा निर्णय घेतलेला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, सर्वपक्षियांच्या मतानुसार मनोज जरांगे पाटील यांनी आता उपोषण मागे घेतले पाहिजे. त्यांनी गठीत केलेल्या समितीला वेळ दिला पाहिजे. समितीमध्ये जरांगे पाटील किंवा त्यांच्या सदस्याला घेतले जाईल. ३ अधिकाऱ्यांनाही सरकारने निलंबित केलेले आहे. याचा विचार करुन त्यांनी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 22
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 329

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स