आजपासून गणेशोत्सव संपेपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बंद ; सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण.
मुंबई | ब्युरो न्यूज : यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘मुंबई – गोवा राष्ट्रीय’ महामार्गावर अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. आज रविवार दिनांक २७ ऑगस्ट पासूनच या निर्णयाची अमंलबजावणी होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे.
रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना सुखकर प्रवास करता यावा म्हणजेच रस्त्यावरील खड्यांच्या समस्येपासून मुक्तता व्हावी यासाठी सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे, त्यामुळं जड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळं रविवार, २७ ऑगस्टपासून गणेशोत्सव संपेपर्यंत मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनांसाठी बंद असणार आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या अवजड वाहन चालकांनी पर्यायी महामार्गाचा वापर करावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)